'सतीश चव्हाणांनी पदवीधरांचा वाटोळं केलं, बोराळकर हेही त्यांचीच B टीम'

'सतीश चव्हाणांनी पदवीधरांचा वाटोळं केलं, बोराळकर हेही त्यांचीच B टीम'

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही फडकलं बंडाचं निशाण...

  • Share this:

जालना, 15 नोव्हेंबर: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा उमेदवार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांचे वाटोळं केलं आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर हे सतीश चव्हाण यांचीच 'बी' टीम असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ता सेलचे प्रदेश सचिव प्रा. विजय सुरासे यांनी करत त्यांना घरचा आहेर दिला आहे.

सतीश चव्हाण यांनी पदवीधर, विनाअनुदानित शिक्षक, बेरोजगार यांच्यासाठी 12 वर्षांत केलेली किमान 12 कामे तरी दाखवावी, असं आव्हान प्रा. विजय सुरासे यांनी दिलं आहे.

हेही वाचा...महाराष्ट्र सरकारचा दारूण पराभव! म्हणत भाजप नेते राम कदमांनी केली मोठी गर्जना!

प्रा.विजय सुरासे यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केलं आहे. प्रा. सुरासे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शिक्षण संस्थेवरील शिक्षकपदाच्या नोकरीचा राजीनामा देऊन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

सतीश चव्हाण यांची हॅट्ट्रिक होणार?

आमदा सतीश चव्हाण आता पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा उतरले आहेत. या निवडणुकीची त्यांनी तब्बल वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी 12 वर्षांत तळागाळात पाळेमुळे रुजवली होती. त्यामुळे औरंगाबादसह जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहेत. त्याचबरोवर सतीश चव्हाण यांचा जनसंपर्कदेखील दांडगा आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचं पारडं जड असल्याचं चित्र आहे.

मात्र, दुसरीकडे, सतीश चव्हाण यांच्यासमोर भाजपचं मोठं आव्हान असणार आहे. भाजप नेते विक्रम काळे यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करताना वडील वसंतराव काळे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाल्याची आठवण करून दिली. त्यामुळे विजय आपलाच आहे, अशा भ्रमात महाविकास आघाडीनं राहू नये, असं विक्रम काळे यांनी सांगितलं. दरम्यान, बिहार, मध्यप्रदेशात कमळाची पीक जोरात आलं आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

हेही वाचा...मनावर दगड ठेवून दिवाळीचा शिरस्ता मोडावा लागतोय; सुप्रिया सुळेंचं भावनिक आवाहन

भाजपमध्येही फडकलं बंडाचं निशाण...

भाजपनं शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना प्रवीण घुगे व रमेश पोकळे यांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमध्ये बंडाळीचा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना फायदा होऊ शकतो, असंही बोललं जात आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 15, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या