JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 4 वर, 11 जणांना वाचवलं

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 4 वर, 11 जणांना वाचवलं

Bhiwandi Building Collapse : कैलासनगर ( वळपाडा) इथं वर्धमान कम्पाउंडमध्ये शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास इमारत कोसळली होती.

जाहिरात

(भिवंडीत इमारत कोसळली)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भिवंडी, 29 एप्रिल : मुंबई जवळील भिवंडीमध्ये पुन्हा एकदा इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.  या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा हा 4 वर पोहोचला आहे. . घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाराखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापनची टीम घटना स्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मौजे कैलासनगर ( वळपाडा) येथे वर्धमान कम्पाउंडमध्ये शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास इमारत कोसळली. ही इमारत G+2 अशी होती. त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर साधारण 3 ते 4 कुटुंब राहत होते. तर खालच्या मजल्यात काही कामगार काम करत होते. दुपारी अचानक मोठा आवाज झाली आणि इमारत खाली कोसळली. क इमारत कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला. इमारतीच्या ढिगाराखाली 15 जण अडकले गेले होते. नागपूरमध्ये भीषण अपघात, आई-वडील अन् मुलीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी   घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली. गेल्या 6 तासांपासून शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या कुटुंबीयांना बाहेर काढलं गेलं. आतापर्यंत इमारत कोसळल्यानतंर ढिगार्‍याखालून एक महिला आणि लहान बाळाला बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले. मागील सहा तासांमदअये  एकूण 11 रहिवाश्यांच्या सुखरूप सुटका करण्यात आली आहे. एकूण 4 रहिवाश्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.  नवनाथ सावंत (वय 40) आणि लक्ष्मीदेवी रवी म्हातो (वय 26) अशी मृतांची नावं आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. भिवंडीतील वर्धमान इमारत कोसळून सहा तासांचा दीर्घकाळ ओलांडला आहे. मागील सहा तासात TDRF NDRF च्या जवावांनी 9 जखमीना  बाहेर काढून रुग्णालयात पाठवले आहे. आणखी काही नागरिक ढिगार्‍याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रात्रभर ढिगारा काढून शोधकार्य सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या