नागपूर, 29 एप्रिल : रामटेकजवळील आमडी फाट्यावर भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडीही झाली होती. कुटुंबीय दुचाकीवरून जात असताना भीषण अपघात झाला. यामध्ये आई-वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरुन जाणाऱ्या चौघांना भरधाव ट्रकने उडवल्याने हा अपघात झाला. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली. तसंच महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रांगही लागली. आमडी फाट्यावर सतत अपघात होत असल्यानं अंडरब्रिजची मागणी पुन्हा एकदा केली जात आहे. Bhiwandi Building Collapse : भिवंडीत इमारत कोसळली, 15 जण ढिगाऱ्याखाली अडकले समृद्धी महामार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाला अपघात हरियाणा येथे आरोपीला घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांच्या गाडीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. पोलिसांच्या गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. वर्धा येथील येळाकेळी टोल प्लाझाजवळ घडलेल्या या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.