JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pankaja Munde : पंकजा मुंडेंसाठी दोन प्रमुख पक्षांची फिल्डिंग, थेट मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर!

Pankaja Munde : पंकजा मुंडेंसाठी दोन प्रमुख पक्षांची फिल्डिंग, थेट मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडे यांना दोन प्रमुख पक्षांनी ऑफर दिली आहे, एवढच नाही तर मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासनही पंकजा मुंडे यांना देण्यात आलं आहे.

जाहिरात

पंकजा मुंडेंना ऑफर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 24 जून : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडेंनी बीआरएसनं ऑफर दिल्याची माहिती समोर आली असतानाच एमआयएमही त्यांच्यासाठी आग्रही आहे. दोन वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना एमआयएमनंही पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच बीआरएसनंही त्यांना ऑफर दिलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय. पंकज मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच इम्तियाज जलिल म्हणाले होते, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. तर बीआरएसने पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर दिली आहे. या चर्चांवर आता पंकजा मुंडे काय उत्तर देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, 5 मुद्यांवर पुस्तक काढण्याचा दिला सल्ला पंकजा मुंडे यांनी बीआरएस पक्षात यावे, त्यांना मुख्यमंत्री करू, अशी ऑफर बीआरएस पक्षाचे राज्य समन्वयक बाळासाहेब सानप आणि शिवराज बांगर यांनी दिली आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडेंना डावललं जात आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घुसमट आहे, त्यांनी भाषणामध्येही नाराजी बोलून दाखवली, असा दावाही बीआरएसने केला आहे. ‘बीआरएस संपूर्ण ताकदीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पंकजा मुंडे यांनी बीआरएसमध्ये येऊन शेतकऱ्याचे सरकार राज्यात आणण्यासाठी सोबत यावं. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून बीआरएस त्यांचा विचार करेल,’ असं बीआरएसने सांगितलं आहे. खासदार ठाकरे गटाचा अन् रस्सीखेच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये; भाजप-शिंदेगटातही ‘या’ जागेवरुन वाद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या