जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dharashiv Loksabha : खा. ठाकरे गटाचा अन् रस्सीखेच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये; भाजप-शिंदेगटातही 'या' जागेवरुन वाद

Dharashiv Loksabha : खा. ठाकरे गटाचा अन् रस्सीखेच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये; भाजप-शिंदेगटातही 'या' जागेवरुन वाद

महाविकास आघाडी

महाविकास आघाडी

Dharashiv Loksabha : धाराशीव लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रत्यक्षात या मतदारसंघात ठाकरे गटाचा खासदार आहे.

  • -MIN READ Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव, 24 जून : शिवसेना (शिंदे गट) भाजप यांच्यानंतर आता आघाडीत राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागेवर काँग्रेसने दावा केल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. धाराशिव लोकसभेच्या जागेवरती जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे लोकसभा लढवा अशी मागणी केली असून कार्यकर्त्यांच्या या मागणीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही समर्थन दिलं आहे. पटोले यांच्या समर्थनामुळे धाराशिव जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत. एका जागे 4 पक्षात रस्सीखेच धाराशिव लोकसभेच्या जागेवरून शिंदे गटाची शिवसेना व भाजप हे एकमेकांसमोर उभे ठाकले असताना आता महाविकास आघाडीमध्ये देखील लोकसभेच्या जागेवरून वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत. आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात धाराशिव लोकसभेची जागा आहे. या जागेवरती आघाडीतून लढून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व आता भाजपमध्ये असणारे राणा पाटील यांचा पराभव देखील झाला आहे. आता याच राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसनं दावा सांगत या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद असून ही जागा लोकसभेसाठी माजी मंत्री बसुराज पाटील यांना सोडा अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांची मागणी पाहून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघ काँग्रेसची ताकद असून दहा ते अकरा वेळेस या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार निवडून आला असून कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीला त्यांनी एक प्रकारे समर्थन दिलं आहे. वाचा -  Breaking news : राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा, जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ? पटोले यांनी या काँग्रेसच्या मागणीला समर्थन दिले असले तरी सध्या ही जागा ठाकरे गटाकडे असून खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा या जागेवरती इच्छुक आहेत. महाविकास आघाडीचे ते उमेदवार असण्याची शक्यता असतानाच आता आघाडीतील घटक पक्ष दावे करू लागल्याने त्यांचीही काहीशी अडचण झाली आहे. त्यांना याबाबत विचारले असता प्रत्येक कार्यकर्त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे. त्यात काहीच गैर नाही पण मोदी व भाजपला पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढलं पाहिजे असल्याचं सांगत माझ्या जागेबाबतीत उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी न्यूज 18 लोकमतला बोलताना सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी बाकी असतानाच या जागेवरून युती व महाविकास आघाडी मध्ये दावेप्रतीदावे सुरू असून नेमकी जागा कोणाला सुटणार? कोण लढणार व विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मात्र निवडणुकीच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मात्र बुक ठोकण्याचा कार्यक्रम जोरात चालल्याचं पाहिला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात