JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहात तर..' धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज, म्हणाले..

'तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहात तर..' धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज, म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना खुलं आव्हान दिलं आहे.

जाहिरात

धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 11 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात नेहमीच राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. दरम्यान, परळी वैजनाथ येथील सभेत बोलत असताना आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहात तर या एमआयडीसीत एक मोठा प्रकल्प आणून दाखवा, असे खुलं आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिले आहे. परळी तालुक्यातील इंदपवाडी व जीरेवाडी येथे जलजीवन कामाचा भूमिपूजन कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. काय म्हणाले धनंजय मुंडे? पुढे बोलताना म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे विकास कामे खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, विनाकारण यावरून टीका टिप्पण्या केल्या जात आहेत. मी एमआयडीसी आणली. पंकजा मुंडे यांच्या काळात पाच वेळा भूमिपूजन झालेल्या बायपासचे काम रखडले होते ते आपण अवघ्या दीड वर्षात पूर्ण केल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच जलजीवन मिशनच्या कामाचा संपूर्ण आराखडा आपण पालकमंत्री असल्याचा कार्यकाळात केल्याचे सांगून एमआयडी सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण मंजूर करून आणला आहे. निदान या एमआयडीसीच्या प्रकल्पात आपले वजन वापरून एखादा मोठा प्रकल्प आणून दाखवावा, असे आपले ओपन चॅलेंज असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. वाचा - ‘पुढचा नंबर अनिल परब..’ सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा मोठा दावा बायपासमुळे जमिनीचे भाव वाढले धनंजय मुंडे म्हणाले, माझं सरकार नसताना पाच वेळी भूमिपूजन झालं. एका टोकाला, जिरेवाडी, टोकवाडीतून, मध्यंतरी एकदा अशी भूमिपूजनं झालीत. पण, काम झालं नाही. त्यावेळी आमदार झाल्यानंतर बायपास रद्द करावं लागलं. दुसरं टेंडर करावं लागलं. काम सुरू झाल्यापासून दीड वर्षाच्या आत हा बायपासचा रस्ता पूर्ण केला. बायपासच्या अगोदर आणि आता जमिनीचे भाव किती आहेत, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला. त्या जमिनीचे भाव चार कोटी रुपये एकर आहेत. आपण जमीन कसताना याचा विचार केला होता का. हा बदल असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले. विकास झाल्यानंतर जमिनीची किंमत वाढली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या