मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'पुढचा नंबर अनिल परब..' सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा मोठा दावा

'पुढचा नंबर अनिल परब..' सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा मोठा दावा

सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा मोठा दावा

सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा मोठा दावा

दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने शुक्रवारी अटक केली होती. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 मार्च : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. काल (शुक्रवारी 10 मार्च) सलग चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला आहे. पुढचा नंबर शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल परब यांचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

आता मी म्हणणार उद्या अनिल परब यांना अटक होणार तर पुन्हा म्हणतील की यांना कसं माहिती? मला पुरावे कळतात, मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी अनेक ठिकाणी पाठपुरावा करतो म्हणून मी हे सांगू शकतो. आत्ताच सांगतो की पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. यावेळी

रवींद्र वायकर यांचा नवीन घोटाळा : सोमय्या

शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2 लाख चौरस फुटांचं लहान मुलांचं मैदान बळकावलं असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. बेकायदेशीररित्या पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी दिली. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे शांत का? असा प्रश्न करत वायकर आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

वाचा - राज ठाकरे यांच्या खास माणसाला मनसैनिक वैतागले, नवी मुंबईत मोठे खिंडार

सदानंद कदम यांना अटक

दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास 4 तासांपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचे व संशयास्पद खरेदी-विक्रीचे प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विद्यमान आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचेही नाव आले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

First published:
top videos

    Tags: Anil parab, Kirit Somaiya