JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही 'त्यांनी' केलं लग्न! Video

Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही 'त्यांनी' केलं लग्न! Video

Love Story : भविष्यात अनिकेतचे डोळे जाणार हे माहिती असूनही पल्लवीनं त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचा संसार गेल्या 16 वर्षांपासून सुखानं सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी औरंगाबाद, 9 फेब्रुवारी : आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रत्येक जण सौंदार्यासोबतच भविष्यातील सुरक्षिततेला प्राधान्य देत असतो. भावी जोडीदार भविष्यात दृष्टीहीन होऊ शकतो हे माहिती असून त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय कुणी घेतला तर ते मोठं धाडसं आहे. औरंगाबादच्या पल्लवी दलाल यांनी ते प्रत्यक्ष करुन दाखवलं. पल्लवी आणि अनिकेत दलाल यांची लव्हस्टोरी ही इतरांपेक्षा खूप हटके आहे. कसं फुललं प्रेम? औरंगाबादच्या नागेश्वरवाडी भागामध्ये अनिकेत आणि पल्लवी लहानाचे मोठे झाले. पल्लवी या अनिकेतपेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. दोघांचीही घरं समोरासमोर असल्यानं बालपण एकत्र गेलं. एकाच शाळेत ते शिकले. दोघांमधील या मैत्रीचं रुपांतर लवकरच प्रेमात झालं. पल्लवी यांनी दिलेला लग्नाचा प्रस्ताव अनिकेत यांनी स्वीकारला. एकमेकांना भेटणं, एकत्र फिरणं, एकमेकांसोबत वेळ घालवणं या माध्यमातून अनिकेत-पल्लवी यांचं प्रेम फुलत होतं. त्याचवेळी एकदा दुचाकीवरुन जाताना अनिकेत यांच्या डोळ्याला अचानक अंधारी आली. त्यांनी डॉक्टरकडं जाऊन तपासणी केली. त्यावेळी अनिकेत यांना काचबिंदूचा त्रास असून त्यामध्ये भविष्यात त्यांची दृष्टी जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं. हे ऐकून अनिकेत यांच्या पायाखालची जमीन सरकली. Love Story : असा जोडीदार हवा! ऑनलाईन स्कॅममध्ये अडकलेल्या नेहाला बाहेर काढणारा सौरभ, Video

 पल्लवी निर्णयावर ठाम अनिकेत यांनी या सर्व प्रकाराची कल्पना पल्लवीला दिली. त्याचबरोबर आपण लग्न करू नये असं सुचवलं. त्यावेळी ‘हीच गोष्ट माझ्यासोबत घडली असती तर तू काय निर्णय घेतला असतास?’ असा प्रश्न पल्लवी यांनी अनिकेतला विचारला. पल्लवी यांचा लग्नाचा निर्णय ठाम होता. दोघांच्या लग्नात एकमेकांच्या जातीचाही अडसर होताच. या सर्व अडचणींवर दोघांनी मात केली. आपल्या घरच्यांना निर्णय समजावून सांगितला. त्यानंतर 2007 साली दोघांचं लग्न झालं.

लग्नापूर्वी पल्लवी खासगी बँकेत नोकरी करत होत्या. तर अनिकेत यांचा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. दोघांचा संसार सुरळीत सुरू असतानाच 2012 साली अनिकेतची दृष्टी गेली. दृष्टीहीन झाल्यानं अनिकेत खचले होते. पल्लवी यांनी त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढले.

अनिकेत बनले ‘आयर्न मॅन’ अनिकेत यांना स्विमिंग आणि सायकलिंगचा छंद होता. पल्लवी यांनी त्यांना ते करण्यास प्रोत्साहन दिले. सुरुवातीच्या अडचणीनंतर अनिकेतनं त्यामध्ये पुन्हा एकदा परफेक्ट झाले. त्यांना ‘आयर्न मॅन’ अशी ओळख मिळाली. ‘त्या’ घटनेला 12 वर्ष होत आली आहेत. त्यानंतरही दोघांचा संसार सुखानं सुरू आहे. पल्लवी यांनी नोकरी सोडून स्वत:चा मसाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तर अनिकेत प्रादेशिक विद्या प्राधिकरणात काम करतात. या दोघांना एक मुलगाही आहे. गुलाब उत्पादकांची ‘खुलली कळी’, Valentine Week मध्ये आले अच्छे दिन, Video माझी दृष्टी जाणार हे माहिती झाल्यानंतर मी लग्न करु नये या मताचा होता. पण, पल्लवी निर्णयावर ठाम होती. तिनं मला जगण्याची नवी दिशा दिली. मी आज जे काही आहे त्यामध्ये पल्लवीचा सिंहाचा वाटा आहे,’ अशी भावना अनिकेत यांनी व्यक्त केली. ‘प्रेमामध्ये अनेक वेळा सौंदर्य बघितलं जातं आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतले जाता. माझं आणि अनिकेतचं थोडं वेगळं होतं. आमचं एकमेकांवर प्रेम होतं. दृष्टी जाणार हे माहिती असूनही लग्न करणं ही आमच्या प्रेमाची पावती आहे. प्रेम हे सौंदर्यात नाही तर एकमेकांवर असलेल्या विश्वासात असतं,’  असं पल्लवी यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या