विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक, 7 फेब्रुवारी : प्रेमात पडलेल्या जोडप्याचं जग वेगळं असतं. त्यांना एकमेकांशिवाय काहीच दिसत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याची स्वप्न बघणाऱ्या या जोडप्याची खरी परीक्षा दोघांपाैकी कुणीतरी संकटात सापडल्यावर होते. त्यावेळी अनेकदा त्यांच्या प्रेमकथेचा शेवट होतो. या पद्धतीच्या लव्हस्टोरी तुम्ही अनेकदा पाहिल्या आहेत. पण, नाशिकच्या सौरभ आणि नेहाची लव्हस्टोरी मात्र या सर्वांपेक्षा वेगळी आहे.
सोशल मीडियावर जुळलं प्रेम
सौरभ निकुंभ आणि नेहा बेलेकर यांची भेट सोशल मीडियावर झाली. सोशल मीडियावर भेटलेला सौरभ आपल्याला सर्वात मोठ्या संकटातून बाहेर काढेल, आपला जीवनसाथी होईल असं नेहाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, हे खरोखरच घडलं. नेहा नाशिक जिल्ह्यातील घोटीची रहिवासी नाशिक शहरातला सौरभ मुंबईतील खासगी कंपनीत जॉब करतो. सोशल मीडियावरील चॅटींगमध्ये दोघांमध्ये मैत्री झाली. त्यावेळी नेहा एका मोठ्या संकटात सापडली आहे, हे सौरभला माहिती नव्हतं.
रोज डे ते किस डे पर्यंत प्रेमाच्या 7 दिवसांचे महत्त्व; एकही दिवस मिस नका करू
संकटात खंबीर साथ
नेहाचे वडील आजारी असल्यानं तिला पैशांची गरज होती. तिने अनेकांकडे मदतीसाठी हात पसरला पण, उपयोग झाला नाही. त्यावेळी हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी तिनं लोन ॲपवरून वीस हजारांचं लोन घेतलं. वडिलांच्या उपचाराचा खर्च पूर्ण केला. त्याचवेळी नेहा एका ऑनलाईन स्कॅममध्ये अडकली.
काही दिवसांमध्येच नेहाला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात झाली. वीस हजाराचे लोन फेडण्यासाठी अवाढव्य व्याज भरण्यास सांगण्यात आले. अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या संकटात घाबरलेल्या नेहाची सोशल मीडियावर भेटलेल्या सौरभनं मदत केली. नेहाला आधार दिला. ते दोघं या संकटातून बाहेर पडले. नेहानं बदनामीच्या भीतीनं हा विषय कुणाला सांगितला नाही. पण, सौरभच्या मदतीमुळे नेहाचा तिच्यावर विश्वास बसला. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झाले.
गुलाब उत्पादकांची 'खुलली कळी', Valentine Week मध्ये आले अच्छे दिन, Video
पत्रिका जुळत नसतानाही लग्नाचा निर्णय
सौरभ आणि नेहानं एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या घरी लग्नाचा विषय मांडला. त्यावेळी गुरूजींनी त्यांची पत्रिका जुळत नसल्याचं सांगितलं. त्यानंतरही दोघांनी खचून न जाता एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांसोबत आनंदात आहोत, अशी प्रतिक्रिया सौरभनं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Love story, Nashik, Valentine Day