JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Breaking news : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; नार्वेकरांचं निवडणूक आयोगाला पत्र, आमदारांचं टेन्शन वाढलं

Breaking news : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; नार्वेकरांचं निवडणूक आयोगाला पत्र, आमदारांचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील आमदार अपात्रतेच्या कारवाईनं आता चांगलाच वेग घेतला आहे.

जाहिरात

विधानसभा अध्यक्षांचं निवडणूक आयोगाला पत्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे, तुषार रुपनवार :  मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील आमदार अपात्रतेच्या कारवाईनं वेग घेतला आहे. विधीमंडळाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं आहे. या पात्राद्वारे निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळ सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे गरज पडल्यास लवकरच दोन्ही गटांच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपलं म्हणणं आता विधीमंडळासमोर मांडावं लागणार आहे. आमदारांच्या अपात्रेवर निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची याबाबत विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. याच पार्श्वभूमीवर आात विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार गरज पडल्यास लवकरच दोन्ही गटांच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात आला आहे,  पुन्हा एकदा दोन्ही गटाला पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच उलट तपासणीही होऊ शकते. पवारांचा ‘तो’ निर्णय अन् राष्ट्रवादीचा नेता नाराज; सोडणार घड्याळाची साथ? वरिष्ठांकडून मनधरणीचे प्रयत्न सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?  गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टानं राज्यातील संत्तासंघर्षावर निकाल दिला होता. यावेळी न्यायालयाकडून तत्कालीन राज्यपाल, आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढण्यात आले होते. तसेच शिंदे गट शिवसेनेकडून नियुक्त करण्यात आलेले प्रतोत भरत गोगावले हे देखील घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं होतं. त्यानंतर आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या