नितेश राणेंची गाडी आडवण्याचा प्रयत्न
अमरावती, 10 जून, संजय शेंडे : अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते नितेश राणे हे अमरावती दौऱ्यावर होते. ते अमरावती जिल्ह्याचा दौरा आटोपून नागपूरच्या दिशेनं जात असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांकडून नितेश राणे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत नितेश राणे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
…म्हणून अजितदादांना जबाबदारी दिली नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं अखेर कारण सांगितलं!अखेर नितेश राणे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नितेश राणे पुढील प्रवासाठी रवाना झाले.