JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जिथे जिथे 'मविआ'ची सभा तिथे तिथे.., नवनीत राणांचा नवा निर्धार!

जिथे जिथे 'मविआ'ची सभा तिथे तिथे.., नवनीत राणांचा नवा निर्धार!

पुन्हा एकदा हनुमान चालीसावरून नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

जाहिरात

खासदार नवनीत राणांचा मविआला इशारा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 6 एप्रिल :  आज हनुमान जयंती आहे, राज्यभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पुन्हा एकदा हनुमान चालीसावरून नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे स्व:ताचा पक्ष सांभाळू शकले नाहीत, पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत, आज बाळासाहेब ठाकरे देखील आश्रू ढाळत असतील असा जोरदार टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. नेमकं काय म्हणाल्या राणा?  नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच जिथे जिथे मविआची सभा होईल, तिथे-तिथे हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. माजी काय चूक होती? राज्यावरचं संकट दूर व्हाव, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसेचं पठण करावं एवढीच विनंती मी केली होती. मात्र तेव्हा आम्हाला 14 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बारा तास उभ ठेवलं, तुरुंगात पाणी सुद्धा दिलं नाही, मुलं विचारायचे आई तु काय गुन्हा केलास? असं राणा यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना टोला    दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. विचार काय असतात आणि त्यासाठी कसे लढावे हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विचार धुळीस मिसळवले. ते पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत. ते पक्ष सांभाळू शकले नाहीत अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच जिथे-जिथे मविआची सभा होणार तिथे-तिथे हनुमान चालीसेचं पठण करणार असल्याचा इशाराही यावेळी नवनीत राणा यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या