JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BJP : अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना 4 सवाल, नांदेडमधून दिलं थेट आव्हान

BJP : अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना 4 सवाल, नांदेडमधून दिलं थेट आव्हान

नांदेडमधल्या जाहीर सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जाहिरात

अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 10 जून : केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात भाजपकडून महा-जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये आले होते. या सभेतून अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर येऊन माझ्या 4 प्रश्नांचं उत्तर द्यावं, असं आव्हानही अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाहीत. 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला आणि ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीत जाऊन बसले. ज्यावेळी युतीची बोलणी करायला गेलो होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार, असं उद्धव ठाकरे यांनीदेखील सांगितलं होतं, असं झालं का नाही, याचं उत्तर ठाकरेंना द्यावं,’ असं टीकास्त्र अमित शाह यांनी सोडलं.

संबंधित बातम्या

‘कलम 370 हटवलं हे योग्य केलं का नाही? राम मंदिर उभारणी करता ते योग्य करता की नाही? मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही, मुस्लिम आरक्षण पाहिजे का नाही? हेदेखील उद्धव ठाकरे यांनी सांगावं,’ असं अमित शाह म्हणाले. जेवढे प्रश्न उभे केले आहेत, या सगळ्यांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर द्यावीत. दोन दगडांवर पाय ठेवू नयेत, असा निशाणा अमित शाह यांनी साधला. तसंच शिवसेना आम्ही फोडली नाही तर शिवसैनिकांनी फोडल्याचंही अमित शाह म्हणाले. 2024 ला महाराष्ट्रातून किती खासदार निवडून आणणार? अमित शाहांसमोरच फडणवीसांनी सांगितला आकडा काँग्रेसवरही निशाणा या सभेमध्ये अमित शाह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसचं सरकार असताना देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षांमध्ये इतिहास घडवला. 9 वर्षांमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही. 9 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. ‘राहुलबाबा म्हणायचे मंदिर बनायेंगे, पर तारीख नही बताएंगे, पण मी सांगतो 2024 ला अयोध्येत भव्य राम मंदिर तयार असेल. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाचा अपमान करतात. परदेशात जाऊन देशाबद्दल असं बोलत नाहीत. तुम्हाला माहिती नसेल तर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना विचारा. देशात राहुल गांधी यांना कुणी ऐकायला राहिलं नाही, म्हणून ते परदेशात जाऊन बोलतात,’ अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या