नांदेड, 10 जून : केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात भाजपकडून महा-जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये आले आहेत. अमित शाह यांच्यासमोरच देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. ‘भाजपला नांदेड लोकसभेची जागा जिंकता येईल का नाही? याबाबत शंका आहे म्हणून अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. अशोकराव तुमची मजल टू जी, थ्री जी, सोनिया जीपर्यंत आहे. काही जण महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न चालेल असं म्हणत आहेत, पण महाराष्ट्रात फक्त एकच पॅटर्न चालतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पॅटर्न,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पवारांवर निशाणा ‘2014, 2019 प्रत्येक निवडणुकीत शरद पवार एकच सांगतात, मोदी लाट ओसरली पण रेकॉर्ड ब्रेक मतांनी मोदीजी निवडून येतात. काल हा देश मोदीजींच्या मागे होता, आज आहे आणि उद्याही असेल,’ असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर साधला.
🕖6.58pm | 10-06-2023📍Nanded | संध्या. ६.५८ वा. | १०-०६-२०२३📍नांदेड
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2023
LIVE | केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांच्या उपस्थितीत मोदी@9 भाजपा महा-जनसंपर्क अभियान, नांदेड #9YearsOfModi #nanded #maharashtra #amitshah #bjp @AmitShah https://t.co/XPZTxhjzVk
आमची स्पर्धा गुजरातसोबत आहे कोण जास्त खासदार निवडून आणतोय. 2014 ला आम्ही 43 खासदार निवडून आणले, 2019 ला 42 खासदार निवडून आणले. आता 2024 ला 43 पेक्षा जास्त खासदार निवडून आणू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबत व्यक्त केला. ‘महाराष्ट्रात 25 लाख लोकांना मोदीजींनी घर दिलं, मोफत कोविडची लस देण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. 70 वर्षात पाणी पोहोचलं नव्हतं, मोदीजी यांनी 1 कोटी 12 लाख लोकांच्या घरी पाणी पोहोचवलं. त्यांना असं वाटतं आम्ही तिघं एकत्र आहोत, आम्ही काहीही करू शकतो मात्र जंगलात कितीही प्राणी आले तरीही ते वाघाची शिकार करू शकत नाहीत,’ अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर केली.

)







