JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शुगर वाढली त्यामुळे ऑपरेशन...', म्हणून शमलं अजितदादांचं बंड?

'शुगर वाढली त्यामुळे ऑपरेशन...', म्हणून शमलं अजितदादांचं बंड?

गेल्या 2 दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना राज्यात पेव फुटलं होतं. अजित पवारांनी अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं ठणकावलंय.

जाहिरात

अजितदादांनी फेटाळलं भाजपसोबत जायचं वृत्त

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 18 एप्रिल : गेल्या 2 दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना राज्यात पेव फुटलं होतं. अजित पवारांनी अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं ठणकावलंय. कारण नसताना काही लोकं गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जोपर्यंत जिवात जीव आहे, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार अशी ग्वाहीही अजित पवारांनी दिलीय. पक्ष सोडण्याच्या या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

दरम्यान शिवसेनेकडून अजित पवारांबाबतच्या या बातम्यांवर प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आलेत तर त्यांचं स्वागत करु असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं. मात्र, ते आल्यावर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असा इशाराही त्यांनी दिला. यावर अजित पवारांनी संजय शिरसाट यांना टोला लगावला आहे.. आम्ही राष्ट्रवादीतच आहोत, त्यामुळे संजय शिरसाट यांना अस्वस्थ होण्याची गरज नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन… दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावरून सूचक विधान केलं आहे. अजित पवारांविषयी ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्यावर एकच बोलेन, शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन पुढे गेलं. जर तसं काही नसतं, तर आधीच त्यांनी खंडन केलं असतं पण तसं काही त्यांनी केलं नाही. अजितदादा नाराज आहेत, हे आता स्पष्ट दिसतंय, असं नरेश म्हस्के म्हणाले. ‘झाकली मुठ सव्वालाखाची ही बिन बोलाची आहे, हे अजितदादांनी स्पष्ट केलं आहे. सभेत खूर्ची कोणती लावायची, ज्या पक्षाकडे फक्त 15 आमदार त्या पक्षाला मोठी खूर्ची. अजितदादांकडे 56 आमदार आहेत, त्यांना जास्त किंमत पाहिजे की 15 आमदार असणाऱ्यांना? यांनी सगळ्यांनी आधी भाषण करायची, यांची भाषणे सुरू असताना हात वर करून 15 आमदारांचा नेता येतो आणि त्यांचे भाषण थांबवलं जातं,’ असा टोला म्हस्के यांनी लगावला. ‘नागपूरच्या सभेत अजितदादांनी भाषण केलं नाही, यावरून हे बरंच काही सांगून जातं. अजितदादांवर अन्याय होतोय त्यांची गळचेपी होतेय. ही काही वज्रमूठ आहे की सैल झालेली मूठ आहे, हे स्पष्ट होतंय. उद्धव ठाकरेंवर अजितदादांनी अप्रत्यक्ष रित्या टीका केली आहे,’ अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या