प्रतीकात्मक फोटो
लंडन, 25 फेब्रुवारी : आपल्याला सामान्यपणे सर्दी-खोकला होतच असतो. त्यामुळे त्याला आपण फारसं गांभीर्याने घेत नाही. डॉक्टरांकडे जाण्याआधी शक्यतो सुरुवातीला घरच्या घरी काहीतरी उपाय करतो. तरी ते बरं नाही तर आपण डॉक्टरांकडे जातो. पण ही साधी सर्दीची किती घातक ठरू शकते, याचा अंदाजा तुम्हाला आहे का? एका महिलेची सर्दीमुळे अशी अवस्था झाली, जी फक्त वाचूनच तुम्ही हादराल (Woman in coma after cold). ब्रिटनच्या एसेक्समध्ये राहणारी 43 वर्षांची क्लेअर मफेट-रिस. तिला सर्दी झाली होती. तिला वाटलं कॉमन कोल्ड असावं म्हणून ती रात्री तशीच झोपली. पण त्या दिवशी ती झोपली त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठलीच नाही. क्लेअरने नुकत्यात एका मुलाखतीत आपला अनुभव शेअर केला आहे (Woman in coma due to cold). तिचा नवरा स्कॉटनेही मुलाखतीत सांगितलं की, क्लेअरला आमचा मुलगा मॅक्समुळे सर्दी झाली. जवळपास दोन आठवडे तिला सर्दी होती. हळूहळू तिची तब्येत खूप बिघडी लागली. एके रात्री ती झोपली ती सकाळी उठलीच नाही. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. हे वाचा - उतारवयातही हार मानली नाही! केमोथेरेपीशिवाय या आजींनी ब्रेस्ट कॅन्सरवर केली मात आठवडाभर व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर डॉक्टरांना तिच्या आजाराचं निदान झालं. सुरुवातीला ब्रेन ब्लीड असल्याचा संशय होता पण तपासणीत तिला एन्सेफलाइटिस असल्याचं निदान झालं.
सर्दीसह झोपातच क्लेअर कोमात गेली. जेव्हा ती जागी झाली म्हणजे शुद्धीवर आली तेव्हा ती आपली आयुष्याची 20 वर्षेही विसरली. तिची स्मृती हरपली. 16 दिवस ती कोमात होती. कोमातून बाहेर येताच स्कॉट तिच्याशी बोलायला गेला तेव्हा ती विचित्र वागू लागली. ती एका मांजरीबाबत आणि काही नातेवाईकांबाबत विचार होती, ज्यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. हे वाचा - 3 वर्ष आधीच जाणून घेता येईल Heart Attack धोका आहे का? करावी लागेल ही एक टेस्ट द सनच्या रिपोर्टनुसार क्लेअर म्हणाली, स्मृती हरपल्याने आयुष्यातील बऱ्याच महत्त्वाच्या घटना ती विसरली. अजूनही तिला नीट काही लक्षात नाही. त्यामुळे ती जुने फोटो पाहते जेणेकरून तिची स्मृती परत येईल.