जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 3 वर्ष आधीच जाणून घेता येईल Heart Attack धोका आहे का? करावी लागेल ही एक टेस्ट

3 वर्ष आधीच जाणून घेता येईल Heart Attack धोका आहे का? करावी लागेल ही एक टेस्ट

3 वर्ष आधीच जाणून घेता येईल Heart Attack धोका आहे का? करावी लागेल ही एक टेस्ट

हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं (Heart attack Symptoms) दिसू लागतात. ती वेळीच ओळखली तर धोका टाळता येतो. यातच आता शास्त्रज्ञांनी एका नव्या टेस्टचा शोध लावला आहे. या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला तीन वर्ष अगोदरच हार्ट अ‍ॅटॅक चा धोका आहे किंवा नाही, हे समजू शकणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: हृदयविकार (Heart Disease) हा गंभीर स्वरुपाचा आजार मानला जातो. हृदयविकार होण्यामागे चुकीची जीवनशैली, योग्य आहाराचा अभाव, ताण-तणाव, लठ्ठपणा आदी कारणं सांगितली जातात. सर्वसामान्यपणे वृ्द्ध व्यक्तींमध्ये दिसणारा हा विकार अलीकडच्या काळात तरुणांमध्येही दिसून येत आहे. जगभरात दरवर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) अनेक लोकांचा मृत्यू होतो. हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अ‍ॅटॅक येऊ नये, यासाठी आहारात बदल, पुरेसा व्यायाम, ताण-तणावाचं व्यवस्थापन आणि गरजेनुसार औषधोपचार आदी उपाय केले जातात. हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं (Heart attack Symptoms) दिसू लागतात. ती वेळीच ओळखली तर धोका टाळता येतो. यातच आता शास्त्रज्ञांनी एका नव्या टेस्टचा शोध लावला आहे. या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला तीन वर्ष अगोदरच हार्ट अ‍ॅटॅक चा धोका आहे किंवा नाही, हे समजू शकणार आहे. यामुळे हार्ट अ‍ॅटॅकमुळे होणारे मृत्यू टाळण्यास मदत होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हे वाचा- लवकर वजन कमी करायचंय?, मग आहारात समावेश करा ‘हे’ होममेड Drinks वेळीच उपचार न मिळाल्यास हार्ट अ‍ॅटॅक जीवघेणा ठरु शकतो. हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी खूप सारी लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येतात. यात छातीत दुखणं, अस्वस्थता ही प्रमुख लक्षणं आहेत. याशिवाय थकवा, जबडा, घसा, किंवा कंबरदुखी, दोन्ही हात आणि खांद्यामध्ये वेदना हीदेखील लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात. श्वास (Breathing) घेण्यास त्रास होणं हादेखील हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत असू शकतो. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी एक टेस्ट शोधून काढली आहे. या टेस्टच्या मदतीने हार्ट अ‍ॅटॅकचा धोका आहे किंवा नाही हे तीन वर्षं अगोदरच ओळखता येणार आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी पूर्वी हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलेल्या पीडितांमधल्या सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीनची तपासणी केली. यातून इन्फ्लेमेशनचे (Inflammation) संकेत मिळतात. शास्त्रज्ञांनी ट्रोपोनिनची स्टँडर्ड टेस्टही केली. हार्ट डॅमेज झाल्यानंतर हे प्रोटीन रक्तातून बाहेर पडतं. अहवालानुसार, सीआरपी (CRP) पातळी वाढलेल्या आणि ट्रोपोनिन टेस्ट पॉझिटिव्ह असलेल्या ‘एनएचएस’च्या सुमारे अडीच लाख रुग्णांचा मृत्यू तीन वर्षांत होण्याची शक्यता सुमारे 35 टक्के होती. हे वाचा- कोरोनातून बरं झालेल्यांना जाणवतीये टिनिटसची गंभीर समस्या; वेळीच व्हा सावध याबाबत इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनचे डॉ. रमजी खमीज यांनी सांगितलं की, ‘या टेस्टचा शोध अशावेळी लागला आहे, जेव्हा इतर चाचण्यांपेक्षा अधिक असुरक्षित असलेल्या लोकांमध्ये धोका ओळखता येणं शक्य झालं आहे.’ आज तक ने याविषयी वृत्त दिले आहे. या अभ्यासासाठी निधी देणारे ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लिपर म्हणाले की, ‘डॉक्टरांच्या वैद्यकीय किटमध्ये समाविष्ट होणारं हे एक मौल्यवान टूल आहे.’ दिवसातील किमान चार तास अ‍ॅक्टिव्ह राहिल्यास हृदयविकाराचा धोका 43 टक्क्यांपर्यंत कमी होतो, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. शास्त्रज्ञांच्या या संशोधानामुळे योग्य वेळी निरीक्षण करून आणि अँटिइन्फ्लेमटरी औषधांच्या मदतीने लाखो लोकांचा जीव वाचवणं शक्य होणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात