JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / एकाच महिन्यात दोन वेळा प्रेग्नेंट झाली महिला, परिस्थिती बिघडली; सत्य वाचून धक्काच बसेल!

एकाच महिन्यात दोन वेळा प्रेग्नेंट झाली महिला, परिस्थिती बिघडली; सत्य वाचून धक्काच बसेल!

काय आहे विचित्र प्रकार?

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मे : तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली, तर जन्म-मृत्यूवर विज्ञानाला विजय मिळवता आला नाहीये. जगात घडणाऱ्या अनेक अद्भुत घटना याची साक्ष देत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेला गरोदर असताना पुन्हा दिवस राहिले व तिनं जुळ्या अपत्यांना जन्म दिला; मात्र या जुळ्यांच्या गर्भातल्या वयात 4 आठवड्याचं अंतर होतं. असं असूनही आईसह आता दोन्ही अपत्यांची प्रकृती ठीक आहे. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, इंग्लंडमध्ये एक दुर्मीळ घटना घडली आहे. लेमिनस्टर इथं राहणाऱ्या 30 वर्षीय सोफी स्मॉल या महिलेला गरोदर असताना पुन्हा दिवस राहिले व तिनं डार्सी आणि होली या जुळ्या मुलींना जन्म दिला. ही सुपरफिटेशनची घटना असल्याचं सांगितलं जातंय. स्कॅनिंगदरम्यान दोन्ही बाळांचे आकार लहान-मोठे असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. “सतत डोकं दुखत असल्यानं मला दिवस राहिले असल्यासारखं मला वाटत होतं; पण खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही प्रयत्न सुरू ठेवले होते,” असं सोफी म्हणाली. सुपरफिटेशनमध्ये गर्भावस्थेतच पुन्हा नवीन गर्भ राहतो. मेडिकल लिटरेचरमध्ये अशा घटनांचा उल्लेख करण्यात आलाय. खासकरून ज्या स्त्रिया इन व्हिट्रो फर्टिलायझेशनसारखे (IVF) उपचार घेतात, त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात. गरोदर राहिल्यानंतर काही दिवसांनी किंवा एखाद्या महिन्यानं शुक्राणू स्त्रीबीजाच्या संपर्कात येतो व पुन्हा गर्भ तयार होऊ लागतो. जुळ्या मुलांचा जन्म सुपरफिटेशन प्रक्रियेद्वारेच होतो; मात्र अशा पद्धतीची घटना दुर्मीळ मानली जाते. कारण यासाठी 3 अशक्य गोष्टी शक्य व्हाव्या लागतात. एक तर अंडाशयातून दुसरं स्त्रीबीज बाहेर पडावं लागतं. सामान्यपणे तसं घडत नाही. त्या स्त्रीबीजाचं व शुक्राणूचं मीलन होणं हीदेखील अवघड गोष्ट असते. Pregnancy Feet Swelling Problems : गरोदरपणात पायांना सूज येतेय? या घरगुती उपायांनी मिळेल आराम कारण गरोदरपणात सुरुवातीला सरव्हायकल कॅनॉलमध्ये म्युकस तयार होतो. त्यामुळे शुक्राणू आत प्रवेश करू शकत नाहीत. गर्भाशयात आधीच एक गर्भ वाढत असताना आणखी एका गर्भाचं रोपण हीसुद्धा अशक्य गोष्ट असते. या तिन्ही गोष्टी शक्य झाल्या तरच अशा प्रकारच्या घटना घडतात. अशा घटनांमध्ये दोन्ही गर्भांचं गर्भाशयातलं वय वेगवेगळं असतं. म्हणजेच दोन्ही बाळांचा विकास वेगवेगळ्या टप्प्यात होतो. इतर जुळ्या मुलांपेक्षा ही मुलं वेगळी असतात. सोफी या महिलेला जुळ्या मुलींआधी ऑस्कर नावाचा एक मुलगा आहे. जुळ्या मुलींना जन्म देताना सात महिन्यांत आठ वेळा हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ तिच्यावर आली होती. सातव्या महिन्यात स्कॅनिंग झाल्यावर एक बाळ दुसऱ्यापेक्षा आकारानं मोठं का आहे, हे डॉक्टरांनाही समजत नव्हतं. दोन्ही मुलींच्या विकासात 35 टक्क्यांचा फरक होता; मात्र जन्मानंतर आता दोन्ही मुलींची तब्येत ठीक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या