प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 13 जून : जेव्हा तुम्ही एखाद्यावर खूप प्रेम करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा विचार करता. शिवाय आपल्या जोडीदाराच्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करतो. पण कधी कधी अशी प्रकरण देखील लक्षात आली आहेत, ज्यामध्ये एखादा जोडीदार लग्न झालेलं असतानाही आपल्या पार्टनरची फसवणूक करत असतो. नातेसंबंधात जोडीदाराची फसवणूक करणे खूप चुकीचे आहे आणि ते क्षमा करण्यास पात्र नाही. त्यामुळे अनेक नाती तुटतात आणि लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. जेव्हा एखाद्या जाडीदार स्वत: खूश आणि आनंदी राहण्यासाठी दुसऱ्या जोडीदाराची फसवणूक करत असतो आणि ही गोष्टी जेव्हा त्याला कळते, तेव्हा मात्र पार्टनरच्या भावना दुखावतात. अशा परिस्थितीत फसवणूक करणारा माणूस आनंदी होतो आणि जीवनाचा आनंद घेतो. पण असा प्रश्न उपस्थीत राहातो की, लग्नानंतर लोक आपल्या जोडीदाराला का धोकादेतात? त्यांना आपला जोडीदार आवडलेला नसतो तर ते लग्नच का करतात? बऱ्याचदा तर लव मॅरेज केल्यानंतर देखील अनेक जोडीदार आपल्या पार्टनरला धोका देतात. पण असं का? विवाहबाह्य संबधातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहात का? चला आपण या मागची काही कारणं जाणून घेऊ या. 1. लोक त्यांच्या जोडीदारावर नाखूष असतात- बरेच जोडीदारांची अशी तक्रार असते की त्यांच्या जोडीदाराला प्रणय कसा करावा हे माहिती नसते. जोडीदाराची फसवणूक करण्याचे हे एक मोठे कारण आहे. अनेकवेळा बायका तक्रार करतात की लग्नानंतर इतर स्त्रियांना जे सुख पतीकडून मिळतं ते त्यांना मिळत नाही. अशा परिस्थितीत हे लोक आपल्या जोडीदारावर नाराज असतात. 2. जोडीदाराला द्यायला वेळ नसतो- महिला असोत किंवा मग पुरुष कधी-कधी होतं असं की पुरुष आपल्या कुटुंबासाठी कमवण्यात इतका व्यस्त होतो की त्याला आपल्या बायकोला द्यायला वेळ नसतो, ज्यामुळे बायकोला जर दुसरा एखादा हक्काचा व्यक्ती मिळाला जो तिला प्रेम आणि वेळ देत असेल तर नक्कीच तिचं मन त्या तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतं. या उलट जेव्हा बायको घरचं सगळं काम करुन थकते. तेव्हा तिच्याकडे आपल्या नवऱ्याला द्यायला वेळ नसतो. अशावेळी नवरा बायकोचं प्रेम आणि वेळ दुसऱ्या महिलेत शोधू लागतो.
3. एखाद्याला निर्दोषतेचा लाभ मिळतो- अनेक जोडप्यांमध्ये, दोन जोडीदारांपैकी एक इतका सरळ असतो की त्यांच्या निरागसतेचा सहज फायदा घेतला जाऊ शकतो आणि लोक तेच करतात. निष्पाप स्वभावाच्या लोकांना फसवणे खूप सोपे आहे. त्यामुळे लग्नानंतरही लोक आपल्या पार्टनरला खूप हुशारीने फसवतात. 4. जोडीदाराकडून आनंद मिळत नाही- अनेक वेळा जोडप्यांमधील पुरुष महिलांकडे अधिक आकर्षित होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे लग्न झाल्यानंतरही अनेक पुरुष इतर महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये राहतात. जो जोडीदारासाठी मोठा विश्वासघात आहे. अनेक पुरुष हे करण्याआधी विचारही करत नाहीत किंवा त्यांना याबद्दल चुकीची भावनाही येत नाही. कारण लग्नानंतर पुरुष आपल्या जोडीदारासोबतही खुश नसतात.