लंडन, 28 जानेवारी : बऱ्याच फिल्म तुम्ही पाहिलं असेल की अगदी बर्फाळ ठिकाणी अभिनेत्री शॉर्ट कपडे घालून सीन देतात. इतकंच नव्हे तर अगदी प्रत्यक्षातही बऱ्याच तरुणी कडाक्याच्या थंडीतही बिनधास्तपणे शॉर्ट कपडे घालून फिरताना दिसतात. संपूर्ण अंग झाकेल असं कपडे घालूनही आपल्याला हुडहुडी भरते मग या तरुणींना शॉर्ट ड्रेस घालून थंडी लागत नाही का? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी हमखास पडला असेलच. शॉर्ट ड्रेस घालूनही मुलींना थंडी लागत नाही का? किंवा का लागत नाही, या प्रश्नाचं उत्तर अखेर यूकेच्या संशोधकांनी शोधून काढलं आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ सोशल सायकॉलॉजीमध्ये हा रिसर्च पब्लिश करण्यात आला आहे. द सनच्या रिपोर्टनुसार या रिचर्समध्ये म्हटलं आहे की तुम्ही हॉट दिसता याचा अर्थ तुम्हाला थंडी लागत नाही असं नाही. इथं यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं की तुम्ही नेमकं कशावर लक्ष केंद्रीत करतात. हे वाचा - घर असो की ऑफिस…या मुलींसमोर कोणाचंही काही चालत नाही, पार्टनरवर गाजवतात वर्चस्व ज्या महिला थंडीत किंवा रात्री छोटे कपडे घालून बाहेर पडतात त्यांचा फोकस हा हॉट दिसण्यावर असतो. आपण सर्वांसमोर कसे दिसत आहोत, याकडे त्यांचं लक्ष असतं. असं रिसर्चमध्ये दिसून आलं. साऊथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या सोशल सायकॉलॉजी स्कॉलर फेलिग यांनी सांगितलं, हे संशोधन बहुतांश प्रमाणात रॅपर कार्डी बीच्या 2014 सालच्या दाव्यावर आधारित आहे. त्यांच्या मते, थंडी लागणं आपल्या प्राथमिकतेवरही अवलंबून आहे. जेव्हा महिलांना चांगलं दिसायचं असतं तेव्हा त्यांना किती भूक लागली आहे किंवा किती थंडी लागते आहे, याचा त्यांना काही फरक पडत नाही. हे वाचा - Shocking! आपल्या मासिक पाळीचं रक्त पिते ही महिला; केला विचित्र दावा संशोधकांनी फ्लोरिडातील महिलांना याबाबत विचारणाही केली. इथं महिला 4 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान असताना रात्री थंडीत क्लबमध्येही जात होत्या. त्यांंनी सेल्फ ऑब्जेक्टिफिकेशनवर जास्त फोकस असल्याचं सांगितलं. त्यामुळे अशा महिलांना थंडी फार लागत नाही, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला.