Home /News /lifestyle /

Shocking! आपल्या मासिक पाळीचं रक्त पिते ही महिला; केला विचित्र दावा

Shocking! आपल्या मासिक पाळीचं रक्त पिते ही महिला; केला विचित्र दावा

मासिक पाळीचं रक्त हे एक शुद्ध औषध असल्याचा दावा महिलेने केला आहे.

    बार्सिलोना, 27 जानेवारी : मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्रावाबाबतही (Menstrual Blood) वेगवेगळी मतं आहे. काहींच्या मते हे रक्त शुद्ध  असतं तर काहींच्या मते अशुद्ध (Period Blood). मासिक पाळीत वापरलं जाणारं कापड स्वच्छ धुवावं, वापरलेल्या पॅड्सची योग्य विल्हेवाट लावावी असं सांगितलं जातं. अशात एका महिला मात्र असं काहीच न करता उलट ती आपल्या मासिक पाळीचं रक्त पिते (Woman drinking Menstrual period Blood). असं करण्यामागे तिने विचित्र कारणही सांगितलं आहे. स्पेनमध्ये राहणारी 30 वर्षांची जॅस्मिन एलिसिया कार्टर (Jasmine Alicia Carter) आपल्या मासिक पाळीचं रक्त पिते. इतकंच नव्हे तर ती आपल्या त्वचेवरही हे रक्त लावते (Woman applied period blood on skin). तिच्या मते, हे रक्त एक शुद्ध औषधासारखं आहे. याचे आरोग्याला बरेच फायदे होता (Woman claim period blood is pure medicine). हे वाचा - OMG! गेल्या 10 वर्षांतच झाली शेकडो मुलं; 66 वर्षांचा आजोबा बनला 138 मुलांचा बाबा जॅस्मीन सांगते, शरीराला ज्या पोषक घटकांची आवश्यकता असते ते घट मासिक पाळीच्या रक्तात असतात. यामध्ये प्रोटिन, आयर्न, झिंक आणि सेलेनियमसोबत अँटिबायोटिक्स गुणधर्म असतात. प्रजनन स्टेम सेलही यात असतात. हे सर्व पोषक घटक आपल्याला मिळावेत, त्याचा आरोग्याला  फायदा मिळावा म्हणून ती आपल्या मासिक पाळीचं रक्त पिते. ती पुढे म्हणाली, मी टॉयलेटमध्ये जाते आणि माझ्या टॅम्पॉनमध्ये जमलेलं रक्त पिते. ते कधी आणि किती प्यायचं हे माझ्यावर अवलंबून आहे. कधी कधी मी एक घोट पिते तर कधी कधी एक कपही पिते. हे वाचा - Sex Education | शारीरिक आकर्षण, प्रेम की केमिकल लोच्या? कसं ओळखाल? एखादी व्यक्ती जितकी स्वस्थ तितकीच तिची मासिक पाळी चांगली असेल. जर तुम्ही रोज जंक फूड खात असाल तर तुमची मासिक पाळी चांगली नाही. तुम्ही संतुलित आहार घेतला आणि पाणी प्यायला तर असं रक्त तुमच्या फायद्याचं ठरेल. त्वचेसाठीही ते चांगलं आहे, असंही ती म्हणाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Periods, Woman

    पुढील बातम्या