JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : चेहऱ्यावर वाफ घेणं का आहे फायदेशीर? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Skin Care : चेहऱ्यावर वाफ घेणं का आहे फायदेशीर? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

गरम पाण्याची वाफ घेणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरते हे तुम्हाला माहीतच असेल. पण याच्यामागे कोणते वैज्ञानिक कारण आहे, आणि याचा आपल्या त्वचेला कसा फायदा होतो हे जाणून घेऊयात.

जाहिरात

चेहऱ्यावर वाफ घेणं का आहे फायदेशीर? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे आपली त्वचा खराब होत असते. त्यामुळे अशा स्थितीत चेहेऱ्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं ठरत. अनेकदा आपण पाहतो की सलूनमध्ये अनेकजण डोक्यावर टॉवेल ठेऊन गरम पाण्याची वाफ घेत असतात. त्यामुळे गरम पाण्याची वाफ घेणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरते हे तुम्हाला माहीतच असेल. पण याच्यामागे कोणते वैज्ञानिक कारण आहे, आणि याचा आपल्या त्वचेला कसा फायदा होतो हे जाणून घेऊयात. हायड्रेशन : कधी-कधी शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्याची त्वचा डिहायड्रेट होऊ लागते. अशावेळी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. ज्यामुळे चेहऱ्याचे हायड्रेशन टिकून राहते आणि तुमचा चेहरा चमकदार होतो. रक्ताभिसरण : अनेकदा त्वचेची कितीही काळजी घेतली तरी त्वचा डिहायड्रेट आणि डल दिसते. अशावेळी चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास त्वचेवरील रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होते आणि हा उपाय प्रभावी ठरतो.

चेहरा साफ ठेवणे : चेहेऱ्यावर नियमितपणे गरम पाण्याची वाफ घेतल्याने तुमच्या त्वचेवर असणारी लहान छिद्र उघडतात आणि या छिद्रातून घाण आणि मृत त्वचा निघून जाते. विशेषत: ज्यांना ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सचा त्रास असतो त्यांच्यासाठी वाफ घेणे हा रामबाण उपाय आहे. यामुळे चेहरा स्वच्छ होतो. Morning Routine : सकाळच्या नाश्त्यामध्ये फळं खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या आश्चर्यकारक माहिती त्वचा तरुण दिसेल :  गरम पाण्याची वाफ घेतल्यावर चेहऱ्यावर कोलेजन आणि इलास्टिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आपला चेहरा तरुण आणि चमकदार होतो. त्यामुळे त्वचा तज्ञ आठवड्यातून तीनदा गरम पाण्याची वाफ घेण्याची शिफारस करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या