नवी दिल्ली 01 मार्च : रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचं युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. अशातच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनविरुद्ध युद्धात अण्वस्त्रांचा (Nuclear weapon) वापर करण्याचे संकेत दिले आहेत. अण्वस्त्रे आणि त्यांचे धोके (Nuclear Bombs Risks) याबाबत जगात नेहमीच चर्चा होत असते. आता पुतीन यांनी अण्वस्त्रे वापरण्याची दिलेली धमकी किती पोकळ आणि किती गंभीर आहे, हे त्यांनाच ठाऊक. परंतु सध्याच्या काळात समजा जगातील सर्व अणुबॉम्बचा (What Would Happen if All Nuclear Bombs Detonated) एकाचवेळी स्फोट झाला तर पृथ्वीवर काय होईल माहितीये का? रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला? विध्वंसाचा भयंकर VIDEO आला समोर YouTube चॅनल Kurzgesagt – In a Nutshell यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे अणुशक्तीचा गैरवापर झाल्यास पृथ्वीला त्याचे परिणाम कसे आणि काय भोगावे लागतील हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा व्हिडिओ 2019 मध्ये तयार करण्यात आला होता आणि त्यातील माहिती आणि निष्कर्ष हे त्यावेळी जगात उपलब्ध असलेल्या अणुबॉम्बच्या संख्येबाबत काढण्यात आले होते. 15000 बॉम्ब फुटल्यानंतर काय होईल? YouTube चॅनलद्वारे तयार केलेला अॅनिमेटेड व्हिडिओ (Animated Video) मार्च 2019 मध्ये पोस्ट करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण जगात एकूण 15,000 अणुबॉम्ब होते. या अभ्यासानुसार, जर 15,000 पैकी 3 बॉम्बचा स्फोट झाला, तर ते एखादं शहर नष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणजेच 13,500 अण्वस्त्रे पृथ्वीवरील 4500 शहरे नष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. 15,000 अणुबॉम्बचा प्रभाव जगातील सर्वांत शक्तिशाली ज्वालामुखी क्राकेटोआपेक्षा 15 पट अधिक विनाशकारी असेल. Kurzgesagt – In a Nutshell च्या मते, या अणुबॉम्बच्या प्रभावामुळे मनुष्य जात पूर्णपणे संपुष्टात येईल.
सगळे अणुबॉम्ब एकाच ठिकाणी फुटल्यास काय होईल? सर्व 15,000 अणुबॉम्बचा एकाच ठिकाणी स्फोट झाल्यास 31 मैल चौरस फूट आगीचा एक गोळा तयार होईल आणि इतका मोठा स्फोट होईल की 1865 मैलांपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त होईल. या स्फोटाचा आवाज जगभर ऐकू येईल आणि त्याचा दाब अनेक आठवडे जाणवेल. यातून निर्माण होणारा मशरूमसारखा ढग इतका उंच आणि मोठा असेल की तो पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्व बाजूंना व्यापून अवकाशात पोहोचेल. समजा जर हा स्फोट अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये (Amazon Rainforest) झाला तर संपूर्ण दक्षिण अमेरिकेला आग लागेल. तसंच किरणोत्सर्गामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा नाश होईल आणि त्याचा वाईट परिणाम शेकडो मैलांपर्यंत दिसून येईल.