जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Russia Ukraine War: रशियाने व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा युक्रेनचा गंभीर आरोप, मोठा विध्वंस झाल्याचा दावा, भयंकर VIDEO आला समोर

Russia Ukraine War: रशियाने व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा युक्रेनचा गंभीर आरोप, मोठा विध्वंस झाल्याचा दावा, भयंकर VIDEO आला समोर

रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला? विध्वंसाचा भयंकर VIDEO आला समोर

रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला? विध्वंसाचा भयंकर VIDEO आला समोर

Vacuum bomb in Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचा दावा युक्रनेकडून करण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 मार्च : जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine war) चढवला असून या युद्धात युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. त्याच दरम्यान आता युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशी रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात प्रतिबंधित असलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा (Vacuum bomb on Urkraine) वापर केला आहे असा दावा करण्यात आला आहे. युक्रेनच्या राजदुतांनी म्हटलं, रशियाने सोमवारी व्हॅक्यूम बॉम्बचा (Vacuum Bomb) वापर केला, ज्यावर जिनिव्हा करारानुसार बंदी आहे. व्हॅक्यमु बॉम्बला सर्वात मोठा बॉम्ब म्हणजेच फादर ऑफ ऑल बॉम्ब असंही म्हटलं जातं. या बॉम्ब हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस झाला असल्याचं बोललं जात आहे. त्याच दरम्यान बॉम्ब हल्ल्याचा एक व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.

असं म्हटलं जात आहे की, रशियाने युक्रनेविरुद्धच्या युद्धात थर्मोबॅरिक शस्त्रांचा (Thermobaric Weapon) वापर केला. थर्मोबॅरिक शस्त्रांत पारंपारिक दारूगोळा वापरला जात नाही. हे उच्च-दाब असलेल्या स्फोटकांनी भरलेले असतात. शक्तिशाली स्फोट घडवण्यासाठी याचा वापर केला जातो. वाचा :  ‘बाबा वेंगा’चं आणखी एक भाकित खरं होण्याची शक्यता, म्हणाले होते रशिया.. रशियाने 2007 मध्ये बनवला 7100 किलोंचा बॉम्ब थर्मोबेरिक बॉम्ब हा जगातील सर्वाधिक घातक अण्वस्त्रांमध्ये गणला जातो. हा बॉम्ब रशियाने 2007 मध्ये तयार केला होता. 7100 किलो वजनाचा हा बॉम्ब वापरला जातो त्यावेळी इमारती आणि माणसांचा सर्वनाश होतो. याला एअरोसॉस बॉम्ब असेही म्हणतात. पोर्ट्समाऊथ युनिव्हर्सिटीच्या पीटल ली यांच्या मते, रशियाने या वॅक्यूम बॉम्बचा वापर 2016 मध्ये सीरियावर केला होता. हा खूपच घातक बॉम्ब आहे. वाचा :  युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर कोणते पर्याय? 44 टनहून अधिक टीएनटी इतका स्फोट रशियाकडे जो बॉम्ब आहे तो एक थर्मोबॅरिक बॉम्ब आहे. याला विविध नावाने संबोधित केले जाते. जसे की, एरोसोल बॉम्ब किंवा वॅक्यूम बॉम्ब किंवा इंधन हवा विस्फोटक. हा एक खूपच शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब आहे. याचा स्फोट 44 टन टीएनटी पेक्षाही जास्त होतो. 300 मीटरपर्यंत होऊ शकतं नुकसान फादर ऑफ ऑल बॉम्ब अर्थात व्हॅक्यूम बॉम्ब हा 300 मीटर पर्यंतच्या परिसराला नुकसान पोहोचवू शकतो. विध्वंसक शस्त्रे एका जेटमधून खाली टाकली जातात आणि हवेत असतानाच त्याचा स्फोट होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात