मुंबई, 11 फेब्रुवारी : उद्यापासून देशभरात प्रेमाचा आठवडा (valentine’s day) सुरू होत आहे. कदाचित तुम्हीही याची सुरुवात केली असेल. याच निमित्ताने आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत. ही गोष्ट साध्या व्यक्तीबद्दल नाहीय. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित या गोष्टीची त्याकाळातही मोठी चर्चा झाली होती. एका महिलेमुळे इंदिरा गांधी यांच्या संसारात देखील वादळ येतंय की काय? अशी शंका निर्माण झाली. चला आता जास्त उत्सुकता न ताणता विषयाला सुरुवात करुयात. एक सुंदर चेहरा. चेहऱ्यावर चार्म, बॉब कट, साडी आणि स्लिवलेस ब्लाऊज. त्या जिथे जायच्या तिथला माहोल बदलून जायचा. संसदेतल्या मंत्रिगणांमध्ये त्या आल्या की हलचल सुरू व्हायची. त्या होत्या तारकेश्वर सिन्हा. पण पंतप्रधान इंदिरा गांधींना काही त्या आवडायच्या नाहीत. त्यांना वाटायचं तारकेश्वर फिरोज गांधींच्या जवळ आहेत. इंदिरा गांधींच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणाऱ्या कॅथरीन फ्रँकनं लिहिलंय, तारकेश्वरी आणि फिरोज गांधी यांचं अफेअर सुरू होतं. इंदिरा गांधींनी ज्या महिलेचा सर्वात जास्त तिरस्कार केला, त्या तारकेश्वरी होत्या. सौंदर्य आणि आक्रमकता तारकेश्वरीचे वडील पाटण्यात सर्जन होते. त्या एकुलत्या एक कन्या होत्या. कॉलेजमध्ये शिकत असतानाच तारकेश्वरी राजकारणात आल्या. बघता बघता त्या बिहारच्या विद्यार्थी नेता बनल्या. त्यावेळी त्या जेमतेम 19-20 वर्षांच्या होत्या. 1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. त्यांचं लग्न निधिदेव सिंह यांच्याशी झालं. ते मोठे वकील होते. राज्य सरकारचे खटले लढायचे. खासदार त्यांना पाहायला यायचे बिहारचे नेते तरुण तारकेश्वरींना ओळखायचेच, पण केंद्रातही नेहरू आणि इतर नेतेमंडळी त्यांना भेटले होते. 1952 मध्ये त्यांना काँग्रेसनं पाटण्याचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. त्या जिंकल्या आणि 26व्या वर्षी लोकसभेत पोचल्या. त्यावेळी सगळे खासदार त्यांना पाहायला आणि ऐकायला लोकसभेत यायचे. तारकेश्वरी यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांचं वक्तृत्व चांगलं होतं. त्या रोज एकापेक्षा एक सुंदर साड्या नेसायच्या. त्या छान तयार होऊन यायच्या. त्यांच्याशी बोलायला मिळालं तर नेते भाग्य समजायचे. त्यांना शेरोशायरी अवगत होती. उत्तराखंडचे वरिष्ठ पत्रकार अविकल थपलियाल म्हणतात, त्यावेळी मी खूप लहान होतो. पण मी त्यांचा ऑटोग्राफ घेतला होता. तो आजही माझ्याकडे आहे. त्या खूप सुंदर होत्या. Valentine’s Day दिवस आधी आकाशात दिसणार विलोभनीय दृश्य; अजिबात चुकवू नका ही संधी आंधी सिनेमाची कथा नक्की कुणावर गीतकार गुलजार यांचं म्हणणं आहे की आँधी सिनेमा इंदिरा गांधींच्या आयुष्यावर आहे. पण तो तारकेश्वरींच्या आयुष्याशीही मिळताजुळता आहे. गुलजार यांनी म्हटलं, 1969 ते 1971 मध्ये तारकेश्वरी यांना लुधियाना शहरात पाहिलं होतं. त्या डॉ. निजलिंगप्पा आणि मोरारजी देसाईंसोबत दौरा करत होत्या. हा कँप इंदिरा गांधींच्या विरोधातला होता. फिरोज आणि तारकेश्वरी फिरोज हे प्लेबॉय होते. जेव्हा तारकेश्वरींना त्यांच्याबरोबर पाहिलं गेलं, तेव्हा चर्चा सुरू झाल्या. पण पत्रकार सुकांत नागार्जुन यांचं म्हणणं असं की, तारकेश्वरींनी खूप सामाजिक कामही केलेलं. त्या काही फक्त ड्रॉइंग रूम गर्ल नव्हत्या. मोरारजींबरोबर असलेल्या त्यांच्या कथित रिलेशनशिपबद्दलही सुकांत असं काही नव्हतं, असं म्हणतात.
मोरारजींच्या प्रेमात आत्महत्येचा प्रयत्न खरं तर तारकेश्वरी यांनी अनेकदा मोरारजींसोबत आपली निष्ठा दाखवली होती. लाल बहादुर शास्त्रींनंतर मोरारजी भाई पंतप्रधान व्हावेत यासाठी त्यांनी गट तयार केला होता. मोरारजींसोबत राहिल्यानं त्यांचं नुकसान झालं. 52, 57 आणि 62मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचं राजकीय करियरच थांबलं. 1978 मध्ये समस्तीपूरची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी राजकारणाला राम राम ठोकला. त्या इंदिरा गांधींची नाराजी असूनही काँग्रेसमध्ये परतल्या. ती वेळ मात्र चुकली. कारण 1977 मध्ये जनता पार्टीनं निवडणूक जिंकली. मोरारजी पंतप्रधान बनले. त्या काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिल्या आणि हरल्या. त्यांच्या पतीला त्यांचा सचिव मानलं जायचं. अनेक यशस्वी स्त्रियांच्या पतीला हा अनुभव येतो. तारकेश्वरी यांची सफाई एका वरिष्ठ पत्रकाराला त्यांनी सांगितलं होतं की मोरारजींसोबत त्याचं काहीच नातं नव्हतं. फक्त लालबहादुर शास्त्रीनंतर त्यांनी पंतप्रधान व्हावं असं त्यांना वाटलं, इतकंच. तारकेश्वरींची मुलं त्यांना दोन मुलं आणि दोन मुली होते. त्यांच्यापैकी कुणी राजकारणात आलं नाही. त्यांचे माठे पुत्र डॉ. उदयन सिन्हा अमेरिकेत कंपनी चालवतात. काही दिवस बिहारला येऊन मुलांना गणित, विज्ञान, रोबोटचं मोफत शिक्षण देतात, त्यांना लॅपटॉप गिफ्ट देतात. तारकेश्वरींचा मृत्यू 14 ऑगस्ट 2007 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण मीडियानं फार दखल घेतली नाही, याचं आश्चर्य वाटतं - संजय श्रीवास्तव