JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Drone for women safety : सावधान! महिलांना त्रास देणाऱ्यावर आता ड्रोनचा वॉच; अवघ्या 4 मिनिटांतच मिळणार मदत

Drone for women safety : सावधान! महिलांना त्रास देणाऱ्यावर आता ड्रोनचा वॉच; अवघ्या 4 मिनिटांतच मिळणार मदत

Drone for woman safety : महिलांच्या सुरक्षेसाठी आता ड्रोन उपलब्ध होणार.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 03 जानेवारी : कामानिमित्त महिलांना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहावं लागतं. काही महिला रात्री उशिरा काम संपवून घरी परतत असतात तर काही नाइट शिफ्टसाठी म्हणून रात्री घराबाहेर पडतात. अशावेळी उपस्थित होतो तो महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न (Woman safety tips). महिलांच्या सुरक्षेसाठी एमर्जन्सी हेल्पलाइन नंबर आहेतच. पण आता महिलांच्या सुरक्षेसाठी ड्रोनही उपलब्ध होणार आहेत (Woman safety drone). ब्रिटनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आता नव्या तंत्रज्ञानाची मदत घेण्याची योजना आखण्यात आली आहे (Drone for woman safety). जेव्हा रात्री महिला एकट्या रस्त्यावरून चालत असतील तेव्हा थर्मल कॅमेरायुक्त ड्रोन त्यांची सुरक्षा करतील (Drones to protect women). जर कुणी त्यांच्यासोबत छेडछाड केली, त्यांना त्रास द्यायला आलं तर हा ड्रोन त्यांच्या मदतीला येणार आहे. महिला मोबाईल अॅपच्या माध्यमातून फ्लाइंड एस्कॉर्टला आपल्या मदतीसाठी बोलावू शकतात. अवघ्या चार मिनिटांत ड्रोन एक शक्तिशाली स्पॉटलाइट आणि थर्मल कॅमेरासोबत संबंधित व्यक्तीचा पाठलाग करेल आणि त्याला घाबरवून पळवून लावेल. हे ड्रोन खूप शक्तिशाली असतील. या एका ड्रोनची किंमत तब्बल 35 लाख रुपये असेल. हे वाचा -  बँक लॉकरमध्ये आढळलं 1000 वर्षे जुनं शिवलिंग; किंमत जाणून व्हाल अवाक डेली स्टार च्या रिपोर्टनुसार ड्रोन डिफेन्सद्वारा हा ड्रोन विकसित करण्यात आला आहे. माजी पोलीस अधिकारी, नागरिक उड्डाण प्राधिकरणाच्या तज्ज्ञांच्या टीमने हा तयार केला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एआय संचालित या ड्रोनची टेस्टिंग केली जाईल. नॉटिंघम युनिव्हर्सिटीमध्ये याची चाचणी केली जाणार असल्याची माहिती ड्रोन डिफेन्सचे संस्थापक रिचर्ड गिल यांनी दिली. हा ड्रोन तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, भविष्यात हा ड्रोन पोलीस हेलिकॉप्टर्सची जागा घेऊ शकतो. पोलीस हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत हा ड्रोन नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक स्वस्त, शांत आणि कमी प्रदूषित असा पर्याय आहे, हे दाखवणं हेच या चाचणी उद्दिष्ट असेल. हे वाचा -  Pictures : हातांच्या पंज्यासारखं दिसतं हे प्रसिद्ध बेट, पाहा PHOTOS रिचर्ड गिल म्हणाले, “हेलिकॉप्टरमार्फत पोलीस सुरक्षा देण्यासाठी प्रति तास तीन लाख रुपये खर्च येतो. यामध्ये पाच चालक दलाचे सदस्य असतात. पण या ड्रोनचा खर्च ताशी फक्त 10 हजार रुपये असेल. 200 फूट उंचीवर हा ड्रोन उडेल आणि याचा एआय फोन सिग्रनला ट्रॅक करेल. गरज पडल्यास कंट्रोल सिस्टममधील पायलट याला नियंत्रित करू शकेल”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या