JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Aadhar Card मध्ये बदल करायचेत; आधार केंद्रात जाण्याची नाही गरज, घरबसल्याच होईल काम

Aadhar Card मध्ये बदल करायचेत; आधार केंद्रात जाण्याची नाही गरज, घरबसल्याच होईल काम

Aadhar card संबंधित सेवा देण्यासाठी UIDAI ने हेल्पलाईन नंबर दिला आहे.

जाहिरात

Aadhar card update

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी  :  तुम्हाला तुमच्या आधारकार्डमध्ये (Aadhaa card) काही बदल करून हवे असतील तर आता आधार केंद्रावर (Aadhaar Kendra) जाण्याची गरज नाही. काही महत्त्वाचे बदल वगळता इतर सर्व बदल घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनं करण्याची सुविधा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) दिली आहे. कोरोना साथीच्या काळात घराबाहेर जाण्यावर असलेल्या निर्बंधामुळे आधारकार्डसंदर्भातील काही कामं मागं राहिली असतील तर ती आता आपल्या सोयीनं घरबसल्या करता येतील. यासाठी यूआयडीएआयनं (UIDAI) एक हेल्पलाईन तयार केला आहे. 1947 डायल करून तुम्ही आधार सेवा मिळवू शकता.

संबंधित बातम्या

तुमच्या मोबाइल किंवा लँडलाइनवरून 1947 वर डायल करून तुम्ही तुमच्या परिसरातील अधिकृत केंद्र शोधू शकता. mAadhaar App चा वापर करूनदेखील आधार केंद्राचा पत्ता शोधू शकता, असं ट्वीट UIDAI नं केलं आहे. हे वाचा - पासवर्ड आठवला नाही आणि एका व्यक्तीला झालं 16 लाखांचं नुकसान; असे पासवर्ड ठेऊ नका आधारकार्डवरील नाव, जन्म तारीख,लिंग, पत्ता आणि भाषा या बाबींमध्ये बदल करायचा असेल तर आता कोणत्याही आधार केंद्रावर न जाता ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या हे काम करता येईल. पण  कुटुंब प्रमुख किंवा पालक यांची माहिती, बायोमेट्रिक अपडेट, मोबाइल नंबरला आधारशी जोडणं अशा बदलांसाठी आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी केंद्रात जाणं आवश्यक आहे. यासाठी आपल्या जवळच्या आधार केंद्राचा शोधही ऑनलाइन घेता येईल. त्यासाठी   राज्य , पिन क्रमांक आणि सर्च बॉक्स अशा तीन पर्यायांची सुविधा उपलब्ध आहे. आधार सेवा केंद्रावर जाण्यासाठीची वेळ तुम्ही ऑनलाइन घेऊ शकता. यासाठी इथं क्लिक करा . शहर किंवा स्थान निवडा वेळ निश्चित करण्यासाठी पुढे जा तुमचा मोबाइल क्रमांक टाका कॅप्चा कोड प्रविष्ट करा तुमच्या मोबाइलवर तुम्हाला एक ओटीपी मिळेल ओटीपी सबमिट करा तुमची आधारकार्ड बाबतची माहिती भरा वैयक्तिक माहिती द्या तुमच्या सोयीची तारीख आणि वेळ निवडा तुम्हाला बुकिंग अपॉईंटमेंट नंबर मिळेल हे वाचा - WhatsApp वर व्हायरल होतोय धोकादायक Worm Malware; फोन हॅक होण्याची शक्यता आता तुम्ही ठरवलेल्या वेळी आधार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक ते सर्व बदल करू शकता. या सुविधेमुळे घरबसल्या आधार केंद्रावर जाण्याची वेळ ठरवता येते आणि त्यावेळी जाऊन आपलं काम करून घेता येतं. त्यामुळे वेळ वाचतो. आधार प्रमाणीकरणासाठी ओटीपी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरच प्राप्त होत असल्यानं ऑनलाइन बदल करताना आपला नोंदणीकृत मोबाइल जवळ असणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या