• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • WhatsApp वर व्हायरल होतोय धोकादायक Worm Malware; फोन हॅक होण्याची शक्यता

WhatsApp वर व्हायरल होतोय धोकादायक Worm Malware; फोन हॅक होण्याची शक्यता

या मालवेअरला अँड्रॉईड वॉर्म म्हटलं आहे. हा फोनमध्ये एडवेअर अपलोड करतो आणि युजर्सच्या कॉन्टॅक्ट्सला ऑटोमॅटिक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवला जातो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 जानेवारी : आपल्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीमुळे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) गेल्या अनेक दिवसांपासून वादात असतानाच आता एका नव्या धोकादायक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजबाबत माहिती समोर आली आहे. याद्वारे अँड्रॉईड युजर्सला टार्गेट केलं जात आहे. हा धोकादायक मेसेज फोनमध्ये Worm इन्स्टॉल करतो, आणि युजर्सचे कॉन्टॅक्ट्सही इफेक्ट करतो. टेक सिक्योरिटी फर्म ESET चे सिक्योरिटी रिसर्चर Lukas Stefanko ने याबाबत माहिती दिली आहे. Lukas Stefanko यांनी या मालवेअरला अँड्रॉईड वॉर्म म्हटलं आहे. हा फोनमध्ये एडवेअर अपलोड करतो आणि युजर्सच्या कॉन्टॅक्ट्सला ऑटोमॅटिक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवला जातो. ज्यावेळी युजर आलेल्या धोकादायक मेसेजवर क्लिक करतो, त्यावेळी तो फोनमध्ये इन्स्टॉल होतो. या मेसेजमध्ये, या अ‍ॅपला डाउनलोड करा आणि नवा मोबाईल फोन जिंका असं लिहिलेलं असतं. अनेक युजर्स अशा मेसेजवर क्लिक करतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर, युजरला गुगल प्ले (Google Play) प्रमाणे दिसणाऱ्या एका वेबसाईटवर नेलं जातं. त्यानंतर ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी मेसेज लिहिलेला येतो, जो Huawei Mobile App प्रमाणे दिसतो. हे युजरच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर नोटिफिकेशन अ‍ॅक्सेस मागितला जातो.

  (वाचा - WhatsApp Web Security आणखी मजबूत; डेस्कटॉपसाठी करावं लागणार व्हेरिफिकेशन)

  हा व्हॉट्सअ‍ॅप मालवेअर अशाप्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की, या अ‍ॅपच्या क्विक रिप्लाय फीचरचा वापर केला जाऊ शकेल. याचाच वापर करून हा मालवेअर युजरच्या कॉन्टॅक्ट्सला सेम स्पॅम रिसिव्ह झालेल्या मेसेजमध्ये रिप्लाय करून इतरांना पाठवतो आणि याची युजरला कोणतीही कल्पना नसते. तुमच्याकडून आलेला मेसेज म्हणून समोरचाही विश्वासाने त्यावर क्लिक करतो. यामुळेच हा मालवेअर मेसेज पसरण्यामागे कारण आहे.

  (वाचा - केबलची गरजच नाही; चालता फिरता Air Charge होणार मोबाईल फोन)

  त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही मालवेअरपासून वाचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कोणत्याही लिंकवरून काहीही डाउनलोड करू नका. कोणतंही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृतपणेच डाउनलोड करा. अशाप्रकारच्या खोट्या लिंक युजरच्या मोबाईलमध्ये खोट्या जाहीराती दाखवून पैसे कमावण्याच्या उद्देशाने पाठवल्या जातात. युजरची प्रायव्हसी, बँक अकाउंटला अशा लिंकमुळे धोका निर्माण होऊ शकतो.
  Published by:Karishma
  First published: