नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : मोबाईल, इंटरनेटच्या जगात पासवर्ड प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईल फोन, बँक अकाउंट, विविध ऍप्ससाठी पासवर्ड ठेवावा लागतो. अनेक जण पासवर्ड हॅक होऊ नये किंवा सुरक्षिततेसाठी स्ट्राँग पासवर्ड (Strong Password) ठेवतात. पण इतका स्ट्राँग पासवर्ड ठेवणंही भारी पडू शकतं. नुकतंच एक असं प्रकरण समोर आलं आहे. पासवर्ड विसरल्यामुळे एका व्यक्तीला तब्बल 16 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. काय आहे प्रकरण - ही घटना कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे. Stefan Thomas नावाचा व्यक्ती आपल्या Bitcoin अकाउंटचा पासवर्ड विसरतो. व्यावसायाने प्रोग्रामर असलेल्या Stefan Thomas ने पासवर्ड आठवण्याचा मोठा प्रयत्न केला. पण त्याला पासवर्ड आठवतचं नव्हता. रिपोर्टनुसार, Stefan Thomas ला त्याच्या या चुकीमुळे जवळपास 16 लाख रुपये (160 मिलियन पाउंड) इतकं नुकसान झालं आहे. त्यामुळे पासवर्ड इतकाही स्ट्राँग ठेऊ नका, जो ओपन करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल. NORDPASS नावाच्या एका पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने 2020 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची लिस्ट जारी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते या वर्षीही 123456 हा पासवर्ड सर्वात कमकुवत पासवर्डच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर एक ते नऊपर्यंतचे आकडे 2 3 4 5 6 7 8 9. तर, तिसऱ्या क्रमांकावर PICTURE ONE हा सर्वात कमकुवत पासवर्ड आहे. अनेक लोकांनी पासवर्डचं स्पेलिंग अर्थात Password हाच पासवर्ड ठेवला आहे. अनेकांनी 123123 हा पासवर्ड ठेवला आहे. हे सर्वात कमकुवत पासवर्ड आहेत. चुकूनही अशाप्रकारच्या कमकुवत किंवा कमजोर पासवर्डचा वापर करू नका. कारण एक कमजोर पासवर्ड युजरची संपूर्ण वैयक्तिक माहिती इंटरनेटवर लीक करू शकतो. त्यामुळे पासवर्ड लक्षात राहील अशाप्रकारे ठेवणं आवश्यक आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पासवर्ड लक्षात राहत नसेल, तर युजर पासवर्ड मॅनेजरची सेवा घेऊ शकतात. अधिकतर पेड ऍप encrypted असतात, त्यांना हॅक करणं अतिशय कठीण असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.