सोयाबीन फेस मास्कचे फायदे
मुंबई, 15 डिसेंबर : सौंदर्य खुलवण्यासाठी विविध प्रकारचे फेस मास्क चेहऱ्यावर लावणं ही सामान्य बाब. विशेषतः महिला कायम फेस पॅक लावतात. हे फेस मास्क विविध प्रकारचे असतात. आज तुम्ही अशा एका फेस मास्कबाबत जाणून घ्या, जो त्वचा आणि आरोग्य दोन्हींसाठी चांगला आहे. हा आहे सोयाबीन फेस मास्क. याबाबत खूप कमी लोकांना माहिती असेल. यामुळेे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतील. सोयाबीन हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. सोयाबिन खाण्यासाठी पौष्टिक असतो. सोयाबीन तुमचं सौंदर्य वाढवण्यातही मदत करतं. सोयाबीनमध्ये इ जीवनसत्व आणि विविध मिनरल्स असतात. सोयाबिन त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतात. अनेक मुली-महिलांना तेलकट त्वचेची समस्या सतावते. काही ऋतुमध्ये त्वचा अजूनच तेलकट होते. सोयाबीन आहारात घेतल्यानं आणि त्याचा फेसमास्क लावण्यानं ही समस्याच बरीच सुटते. सोबतच या फेसमास्कमुळे चेहऱ्याची त्वचा ढिली पडत नाही. सोयाबीन जाडसर वाटून त्यात डाळिंबाचे दाणे वाटून सोबतच थोडी हळद टाका आणि वापरा. हा फेसमास्क लावल्यानं चेहरा उजळेल. चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर त्या सौंदर्य बिघडवतात. मात्र सोयाबीन खाल्ल्यानं ही समस्या सूर होते. कारण सोयाबीन शरीरात एस्ट्रोजन हे हार्मोन बनवतं. यातून सुरकुत्यांना अटकाव होतो. हे वाचा - पुरुष बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, तरी त्यांच्या छातीवर स्तनाग्र का असतात? सोबतच चेहऱ्यावर पडलेले डाग हीसुद्धा अनेकांची समस्या असते. सोयाबीन फेसपॅक वापरल्यानं चेहऱ्यावरचे डाग कमी दिसतात. बारीक केलेल्या सोयाबीनमध्ये दही आणि लिंबू मिसळा. हा फेसपॅक 10 मिनिटे लावून ठेवा. सोयाबीन त्वचेच्या मृत पेशींना हटवून नव्या पेशी निर्माण करतं. हा फेसपॅक 20-25 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. आठवड्यात तीनदा हे करा. हे वाचा - संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय काय? कुठे 12 तर कुठे 14; विकसित देशांचे नियमही सोयाबीनचं सेवन केसांसाठीही फायदेशीर आहे. दाट काळे केस पाहिजे असतील तर सोयाबीन नक्की खा. कारण सोयाबीनमध्ये खूप प्रमाणात प्रथिनं असतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)