जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय काय? कुठे 12 तर कुठे 14; विकसित देशांचे नियमही धक्कादायक

संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय काय? कुठे 12 तर कुठे 14; विकसित देशांचे नियमही धक्कादायक

संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय काय?

संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय काय?

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी अलीकडेच POCSO कायद्यांतर्गत संमतीचे वय बदलण्याचे आवाहन केले होते. POCSO कायदा 2012 अंतर्गत 18 वर्षांखालील शारीरिक संबंध हा गुन्हा मानला जातो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी 10 डिसेंबर रोजी एका खटल्याची सुनावणी करताना सरकारला आवाहन केले होते की, संसदेने पॉस्को कायद्यांतर्गत लैंगिक संमतीच्या वयाचा विचार करावा. ते म्हणाले की, बलात्काराच्या प्रकरणात किशोरवयीन मुलांचा सहभाग असल्याने हे प्रकरण सहमतीने लैंगिक संबंध होते की नाही हे ठरवण्यात न्यायाधीशांना खूप अडचणी येतात. यानंतर संमतीने सेक्स करण्याचे योग्य वय काय असावे? यावरुन देशात चर्चा सुरू झाली आहे. विकसित राष्ट्रांचा विचार केला तर कोणत्या देशात काय वयाची अट आहे? पूर्वी संमतीने सेक्सचे वय 16 होते स्वातंत्र्यानंतर, म्हणजेच 1940 ते 2012 पर्यंत देशात संमतीचे वय 16 वर्षे होते. 2012 मध्ये आणलेल्या POCSO कायद्यानुसार, संमतीचे वय 18 वर्षे करण्यात आले. आकडे काय सांगतात? अहवालानुसार, सध्या देशातील किशोरवयीनांची लोकसंख्या सुमारे 25 कोटी आहे. जगात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची संख्या भारतात आहे. लग्नाआधी सेक्स करणं इथल्या समाजात अयोग्य मानलं जातं. पण सर्व सर्वेक्षणे वेगळीच कथा सांगतात. नुकत्याच झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या अहवालानुसार, 39 टक्के महिलांनी वयाच्या 18 व्या वर्षापूर्वी सेक्स केल्याचे मान्य केले आहे. 25-49 वयोगटातील 10 टक्के महिलांनी कबूल केले की त्यांनी 15 वर्षे वयापर्यंत पोहोचण्यापूर्वी सेक्सचा अनुभव घेतला होता. वाचा - कसं शक्य आहे? शारीरिक संबंध न ठेवता वेदनाशामक इंजेक्शन घेऊन झाली प्रेग्नंट; तरुणीचा अजब दावा सत्य परिस्थिती काय? एनफोल्ड प्रोएक्टिव्ह हेल्थ ट्रस्ट या बाल हक्क धर्मादाय संस्थेने 2016 ते 2020 दरम्यान पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्रातील POCSO न्यायालयांच्या 7064 प्रकरणांचा अभ्यास केला. यातील निम्म्याहून अधिक प्रकरणे 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींशी संबंधित आहेत. बीबीसीने या संस्थेच्या अहवालाचा हवाला देत सविस्तर वृत्त दिले आहे. या अहवालात एकूण 7064 पैकी 1,715 प्रकरणे ‘रोमँटिक’ श्रेणीत ठेवण्यात आली होती. संपूर्ण भारताच्या संदर्भात ही संख्या पाहिली तर ही संख्या मोठी होईल. कारण दरवर्षी POCSO कायद्यांतर्गत देशात लाखो केसेस दाखल होतात.

News18लोकमत
News18लोकमत

जगात संमतीने सेक्स करण्याचे वय काय आहे? ऑस्ट्रेलिया- ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅमिली स्टडीच्या अहवालानुसार, काही क्षेत्र वगळता, देशात सेक्ससाठी संमतीचे वय 16 वर्षे आहे. फ्रान्स - जगातील सर्वात विकसित देशांपैकी एक असलेल्या फ्रान्समध्ये संमतीचे वय 15 वर्षे करण्यात आले आहे. अमेरिका- या देशातील विविध राज्यांमध्ये संमतीने सेक्स करण्याचे वय 16 ते 18 वर्षे आहे. दक्षिण अमेरिका - येथील विविध राज्यांमध्ये सेक्ससाठी संमतीचे वय 12 ते 18 वर्षे आहे. युनिसेफच्या मते येथील सरासरी वय 15 वर्षे आहे. ब्राझीलमध्ये सेक्ससाठी संमतीचे वय 14 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. जर्मनी- युरोपातील सर्व देशांमध्ये सेक्ससाठी संमतीचे वय 14 ते 18 वर्षे आहे. जर्मनीमध्ये हे वय 14 वर्षे आहे, तर मनिलामध्ये हे वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स - बीबीसीनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये 1885 पासून सेक्ससाठी संमतीचे वय 16 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात