जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुरुष बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, तरी त्यांच्या छातीवर स्तनाग्र का असतात?

पुरुष बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, तरी त्यांच्या छातीवर स्तनाग्र का असतात?

file photo

file photo

हा असा अवयव आहे की जर तो पुरुषांमध्ये नसेल तर त्यामुळे शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    शारीरिकदृष्ट्या पुरुष आणि स्त्री वेगवेगळे असतात. दोघांच्या शरीरातली काही अवयव वेगळे आहेत तर काही अवयवांमध्ये साधर्म्य आहे. स्तन हा अवयव पुरुष आणि महिला दोन्हींमध्ये आढळतो. स्त्रिया मुलांना जन्म देतात. त्यामुळे बाळाला स्तनपान करण्यासाठी त्याच्या स्तनांचा उपयोग होतो; मात्र पुरुषांना त्यांच्या स्तनांचा आणि स्तनाग्रांचा (निपल्स) काय उपयोग होतो, असा कधी विचार तुमच्या मनात आलाय का? त्याबद्दल जाणून घेऊ या. ‘आज तक’ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मानवात भ्रूणावस्थेमध्येच निपल्सचा विकास सुरू होतो. न्यूयॉर्कमधल्या ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’मधले पॅलेओअँथ्रोपोलॉजिस्ट इयान टॅटरसॉल यांनी सांगितलं, की गर्भातल्या नर किंवा मादी भ्रूणामध्ये सुरुवातीला समान आनुवंशिक ब्लूप्रिंट असते. त्यामध्ये काही फरक नसतो. जेव्हा आपण तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतो तेव्हा त्यामध्ये बदल होण्यास सुरुवात होते. गर्भधारणेच्या सहा ते सात आठवड्यांनंतर वाय क्रोमोझोममुळे पुरुषाचं शरीर तयार होऊ लागतं. सर्वप्रथम वृषणाचा विकास होतो. हा अवयव शुक्राणू साठवण्याचं काम करतो. पुरुष संप्रेरक म्हणजेच टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची निर्मितीदेखील या अवयवात होते. हे हॉर्मोन गर्भाच्या विकासाच्या वेळी नऊ आठवड्यांपासून बाहेर पडण्यास सुरुवात होते. ते जननेंद्रियांशी संबंधित आनुवंशिक बदल करण्यास सुरवात करतं. मेंदूचाही अशाच प्रकारे विकास होऊ लागतो. हेही वाचा -  Snakes Facts : मृत्यूनंतरही धोकादायक ठरू शकतो साप, शिकार पचवण्यात लागतात काही दिवस इयान टॅटरसॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांमधले निपल्स हा एक Vestigial अवयव आहे. म्हणजेच त्याचा काहीही उपयोग नाही. पुरुषांमध्ये निपल्स असणं कोणत्याही प्रकारच्या चयापचय क्रियेशी संबंधित नाही. उत्क्रांतीनुसारही त्याचं महत्त्व नाही. हा असा अवयव आहे की जर तो पुरुषांमध्ये नसेल तर त्यामुळे शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. खरं तर, पुरुषांच्या शरीरात असे अनेक अवयव आहेत, जे उत्क्रांतीच्या काळापासूनच अस्तित्वात आहेत; पण त्यांचा काहीही उपयोग नाही. इयान म्हणतात, की उत्क्रांतीच्या काळात पुरुषांमध्ये विकसित झालेल्या काही अवयवांना काही महत्त्व नाही; पण ते पुरुषांच्या शरीरामध्ये आहेत. अॅपेंडिक्स, मेल ब्रिस्ट टिश्यूज, अक्कलदाढ आणि पाठीच्या कण्यातील शेवटचं टोक, हे असेच काही निरुपयोगी अवयव आहेत. हे अवयव पुरुषांच्या शरीरात नसले, तरी काही विशेष फरक पडत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: man
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात