JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Bathing Tips: अंघोळ करताना होणाऱ्या या चुका टाळा; तुमच्या Natural beautyवर होईल असा परिणाम

Bathing Tips: अंघोळ करताना होणाऱ्या या चुका टाळा; तुमच्या Natural beautyवर होईल असा परिणाम

आंघोळ करतानाही काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अशा काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात, त्यांचं पालन करून तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य दीर्घकाळ टिकवून (Bathing Tips) ठेवू शकता.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 मार्च : रोज सकाळी आंघोळ करणं हा प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग असतो. सकाळी आंघोळ केल्यानं आपल्याला ताजंतवानं तर वाटतंच; शिवाय, आपल्या दिवसाची सुरुवातही छान होते. पण तुम्हाला आंघोळ करण्याच्या योग्य पद्धती माहीत आहेत का? होय, आपल्यापैकी बहुतेक जण दररोज आंघोळ करताना काही लहान-सहान चुका करतात; ज्यामुळं त्वचा खराब होऊ शकते आणि त्यावरच्या उपचारांसाठी नंतर पैसे खर्च (Skin Care Tips) करावे लागतात. आंघोळ करताना काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात, त्यांचं पालन करून तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य दीर्घकाळ टिकवून (Bathing Tips) ठेवू शकता. खूप वेळ आंघोळ करणं टाळा काही लोकांना त्यांची त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी खूप वेळ आंघोळ करायला आवडते. मात्र, ही सवय तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. जास्त वेळ आंघोळ केल्यामुळं तुमची त्वचा कोरडी पडू लागते आणि त्यामुळे त्वचेवर खाज आणि संसर्ग होण्याची शक्यता देखील वाढते. खूप गरम पाण्यानं आंघोळ करू नका थंडीत आणि उन्हाळ्यातही बहुतेक लोक गरम पाण्यानं आंघोळ करतात. अंघोळीचे पाणी फार गरम असणार नाही, याची काळजी घ्या. खूप गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात आणि त्वचा निर्जीव होऊ लागते. हर्बल उत्पादनं वापरा हल्ली बहुतेक लोक आंघोळ करण्यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरतात. परंतु, त्यामध्ये असलेली रसायनं तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. ही उत्पादनं तुमच्या त्वचेवरील पेशी नष्ट करू शकतात आणि आपण अकाली वयस्क दिसू लागू शकतो. तेव्हा आंघोळ करताना फक्त हर्बल शॅम्पू आणि साबण वापरणं फार महत्त्वाचं आहे. हे वाचा -  चालण्याचा व्यायाम करताना अनेकांकडून ही चूक होते; फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक स्पंज वापरू नका अनेक वेळा आंघोळ करताना त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण ब्रश किंवा स्पंजचा जोरदार वापर करतो. पण आंघोळीची ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. अनेकदा त्वचेला जास्त घासल्यामुळं छिद्रे मोठी होतात. या छिद्रांमधून लहान जंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळं शरीरात अनेक आजार उद्भवू लागतात. हे वाचा -  वयाच्या चाळिशीनंतरही चेहरा दिसेल अगदी तरुण; फक्त आवळ्या असा करा उपयोग टॉवेलनं त्वचेला घासू नका अनेकदा आंघोळीनंतर काही लोक पाणी सुकवण्यासाठी अंगावर टॉवेल घासायला लागतात. मात्र, असं केल्यानं त्वचेतील ओलावा संपून त्वचा कोरडी पडू लागते. म्हणूनच त्वचेवर हळूवारपणे टॉवेल वापरा; जेणेकरून, त्वचेतील ओलावा कायम राहील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या