JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : दररोज फूट मसाज केल्याने चेहऱ्यावर येईल तेज, चमकदार चेहऱ्यासाठी या टिप्स फॉलो करा

Skin Care : दररोज फूट मसाज केल्याने चेहऱ्यावर येईल तेज, चमकदार चेहऱ्यासाठी या टिप्स फॉलो करा

अनेकदा महागडे प्रॉडक्ट्स वापरून देखील त्वचेवर हवा तसा रिझल्ट येत नाही. तेव्हा दररोज तुपाने फूट मसाज केल्याने चेहऱ्यावर तेज येण्यासाठी मदत होते तसेच अनेक शारीरिक समस्या देखील दूर होतात.

जाहिरात

दररोज फूट मसाज केल्याने चेहऱ्यावर येईल तेज, चमकदार चेहऱ्यासाठी या टिप्स फॉलो करा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आपली त्वचा सुंदर, टवटवीत आणि तेजस्वी दिसावी यासाठी आपण बराच प्रयत्न करत असतो. परंतु अनेक स्किन केअर रुटीनचा वापर करून देखील  त्वचेवर हवा तसा रिझल्ट येत नाही. अशावेळी तुमच्या त्वचेचा संबंध तुमच्या पायाच्या तळव्याशी आहे असे जर म्हटले तर कदाचित त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण अनेक तज्ज्ञांच्या मते जर आपण देशी तुपाने पायाच्या तळव्याची मालिश केली तर चेहऱ्यावर कमालीची चमक येते. ही आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे जी शतकानुशतके वापरली जात आहे. असे केल्याने त्वचेला फायदा तर होतोच पण इतर अनेक समस्याही दूर होतात. देशी तूप तळव्यांना चोळण्याचे फायदे : 1. पायाच्या तळव्याला तुपाने मसाज केल्याने चेहऱ्यावर चमक येते, त्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्याही दूर होतात. 2. ज्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, त्यांनी झोपण्यापूर्वी तळव्यांना देशी तुपाने मालिश करावी. 3. जर तुमचा जोडीदार  झोपताना जोरात घोरत असेल तर त्यांच्या तळव्यांना तूप लावल्यास त्यांचे घोरणे कमी होऊ शकेल.

4. अपचन किंवा पोटाच्या समस्यांमुळे त्रासलेल्यांसाठी ही पद्धत खूप उपयुक्त ठरू शकते. 5. झोपण्यापूर्वी तुपाने पायाला मसाज केल्यास तुमचा तणाव दूर होईल. 6. तसेच या पद्धतीचा वापर करून लठ्ठपणा कमी करता येतो. Ruturaj Gaikwad & Utkarsha Pawar Wedding : लग्नात ऋतुराज गायकवाडच्या पत्नीचा हटके लूक, मंगळसूत्राच डिझाईन पाहिलंत का? तुपाने मसाज कसा करावा? रात्री झोपण्यापूर्वी तळहातावर देशी तूप चोळा आणि त्यानंतर पायाच्या तळव्याला मसाज करा. पाय उबदार होईपर्यंत तूप चोळत राहा. मग छान  झोप घ्या, त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसात दिसून येईल. तुपाचा पर्याय काय? सध्या बाजारात तूप खूप महाग मिळते. त्यामुळे सर्वच तुपाने मालिश करू शकतील असे नाही. तेव्हा त्याऐवजी तुम्ही खोबरेल तेल देखील वापरू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या