मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने 3 जून 2023 रोजी उत्कर्षा पवार हिच्यासोबत महाबळेश्वर येथे विवाह केला.
विवाह समारंभाला अनेक स्टार क्रिकेटर्स आणि त्यांच्या कुटुंबाची हजेरी होती. या विवाहाचे फोटो सध्या व्हायरल झाले असून यात ऋतुराज आणि त्याची पत्नी उत्कर्षाच्या लूकची बरीच चर्चा आहे.
ऋतुराज आणि उत्कर्षा दोघांनी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले असून यावेळी उत्कर्षाने हिरव्या रंगाची नऊवारी तर ऋतुराजने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचा फेटा परिधान केला होता.
तसेच रिसेप्शन लूकसाठी दोघांनी पांढऱ्या रंगांच्या कपड्यांची निवड केली होती. यात उत्कर्षाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा तर ऋतुराज पांढऱ्या रंगाची शेरवानीत शोभून दिसत होता.
ऋतुराजची पत्नी उत्कर्षाच्या लग्नातील लुक्स सह तिच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने देखील सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ऋतुराजची पत्नी उत्कर्षा ही महिला क्रिकेटर असून तिला महाराष्ट्राच्या टीमसाठी खेळली आहे. ऋतुराज आणि उत्कर्षाचे लग्न महाबळेश्वर येथील एका आलिशान रिसॉर्टवर पारपडले.