JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दीर्घकाळ SEX केला नसल्यास काय होतं? वाचा सत्य आणि गैरसमजांविषयी

दीर्घकाळ SEX केला नसल्यास काय होतं? वाचा सत्य आणि गैरसमजांविषयी

दीर्घकाळापासून सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटीज न झाल्यामुळे भविष्यातील तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होईल, असा अंदाज अनेक जण बांधतात. सेक्सबाबत (Sex) असलेले काही गैरसमज (Myths) दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी: लैंगिक शिक्षणाच्या (Sex Education) अभावामुळे लैंगिक संबंधांबाबत (sexual Relations) अनेक गैरसमज निर्माण होतात. कोरोना महामारी (Corona Pandemic) आणि तिच्या परिणामांमुळे इंटिमसी (Intimacy) आणि सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटीजवर (Sexual Activities) मर्यादा आल्या आहेत. दीर्घकाळापासून सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटीज न झाल्यामुळे भविष्यातील तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होईल, असा अंदाज अनेक जण बांधतात. सेक्सबाबत (Sex) असलेले काही गैरसमज (Myths) दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. रिअ‍पिअरन्स ऑफ हायमेन असं मानलं जातं की, खूप दिवसांच्या कालावधीमध्ये सेक्स न केल्यास हायमेन (Hymen) पुन्हा दिसू शकतं. मात्र, हा समज पूर्णपणे खोटा आहे. सेक्सॉलॉजिस्ट डॉ. जेस (Sexologist Dr. Jess) यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, जर एखाद्या स्रीनं दीर्घकाळापासून सेक्स केलं नसेल आणि तिला व्हजायना (Vagina) घट्ट झाल्यासारखं वाटत असेल तर ते तणाव, आराम (Comfort) किंवा उत्तेजनेच्या (Arousal) अभावाशी संबंधित असू शकतं. ठराविक काळाच्या गॅपनंतर तुम्ही पुन्हा सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह होण्यास घाबरत असाल तर, पाहिजे तितका वेळ घ्या. ल्युब्जचा (Lube) वापर करा आणि व्हजायनामध्ये काहीही स्लाइड करण्यापूर्वी तुमची अराउजल लेव्हल (Arousal Level) वाढण्याची वाट पहा. शेवटी, सेक्स ही क्रिया कन्सेंट (Consent), कम्फर्ट (Comfort) आणि कॉन्फिडन्सवर (Confidence) अवलंबून असते. हे वाचा- जोडप्यांना सेक्स दरम्यान असते परफॉर्मन्सची चिंता! या 6 मार्गांनी होतील आनंददायी लोअर लिबिडो (कामेच्छा) असंही मानलं जातं की, दीर्घकाळ सेक्स न केल्यानं कामवासना (Libido) कमी होऊ शकते. परंतु, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या इच्छा आणि गरजा तुमच्या जोडीदाराला सांगितल्या पाहिजेत. सेक्स ड्राईव्ह कमी असणं ही गोष्ट सामान्य आहे. तुमच्या लाईफ स्पॅनमध्ये सेक्स ड्राइव्ह बदलणं ही सामान्य अतिशय सामान्य बाब आहे. असेक्शुअल (Asexual) असणंही सामान्य बाब आहे. सध्याच्या हायपरसेक्शुअल (Hypersexual) जगात, तुमच्यापैकी अनेकांना दीर्घकाळ लैंगिक संबंध न ठेवल्याबद्दल कमीपणा वाटू शकतो. मात्र, तुम्ही कितीवेळा सेक्स केलं याला महत्त्व नसून सेक्स करताना तुम्ही किती कम्फर्टेबल आणि सेफ फील करता हे महत्त्वाचं आहे. फिजिऑलॉजिकल इफेक्ट्स (Physiological Effects) नियमित सेक्स केल्यानं काही हेल्थ बेनिफिट्स (Health Benefits) मिळू शकतात. नियमित सेक्स केल्यास रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, ब्लड प्रेशर कमी होतं, तणावाची पातळी कमी होते आणि कार्डिओव्हॅस्क्युलर इव्हेंट्सचा (Cardiovascular Events) धोका कमी होतो. पण, यासाठी सेक्स हा एकमेव पर्याय नाही. विशिष्ट आहार आणि वर्कआउटसारख्या गोष्टींचा अवलंब करूनही हे फायदे मिळवता येतात. हे वाचा- Sex Education | सेक्स पॉवर वाढवण्यासाठी ही योगासने उपयुक्त, Sex Life होईल आनंदी मानसिक आरोग्य (Mental Health) जर तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल तर लो सेक्स ड्राइव्ह ही समस्या ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्या लो सेक्स ड्राइव्हमुळे मानसिक त्रास होत असेल, तर ही नक्कीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याच काळाच्या गॅपनंतर सेक्स करणाऱ्या स्त्रियांसाठी, अस्वस्थपणा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दीर्घकाळाच्या गॅपनंतर स्त्रियांना सेक्स करताना जास्त वेदनांचा सामना करावा लागू शकतो. सेक्स करण्यापूर्वी तुमचा पार्टनर फोरप्लेमध्ये (Foreplay) गुंतेल याची खात्री करा. यामुळे तुम्हाला आणखी मोकळं होण्यास मदत मिळेल. व्हजायनामध्ये ड्रायनेस हे खरं आहे की सेक्शुअल स्टिम्युलेशन अभावी व्हजायनामध्ये नॅचरल ल्युब्रिकेशन (Natural Lubrication) कमी होतं. त्यामुळे जर एखादी महिला दीर्घकाळानंतर सेक्स करत असेल तर तिला ल्युब्रिकंट्स (Lubricants) वापरण्याचा सल्ला दिला जातो. वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास, दीर्घकाळानंतर सेक्स करताना तुम्हाला मदत होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या