Home /News /lifestyle /

Sex Education | जोडप्यांना सेक्स दरम्यान असते परफॉर्मन्सची चिंता! या 6 मार्गांनी होतील आनंददायी संबंध

Sex Education | जोडप्यांना सेक्स दरम्यान असते परफॉर्मन्सची चिंता! या 6 मार्गांनी होतील आनंददायी संबंध

तणाव (Stress) आणि नैराश्याचे (Depression) परिणाम दीर्घकालीन सेक्स आणि सेक्स स्टॅमिना वाढवण्यात अडथळा ठरू शकतात.

    मुंबई, 21 फेब्रुवारी : अनेकदा जोडपे (Couple) शारिरीक संबंध ठेवताना एकमेकांना खूश करण्याचा प्रयत्न करतात. पण, त्याचवेळी आपण जोडीदाराला आनंद देऊ का? आपलं कामगिरी योग्य राहील का? याची चिंता वाटत असते. असे विचार अनेकांच्या मनात येत असतात. पण, जेव्हा कोणी लैंगिक संबंधादरम्यान (Sexual Relation) आपल्या कामगिरीबद्दल जास्त विचार करायला लागतो, तेव्हा ते विकाराचे रूपही घेऊ शकते. सेक्शुअल मेडिसिन रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 9 ते 25 टक्के पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शन आणि शीघ्रपतनाशी संबंधित चिंतेचा त्रास होतो, तर 6 ते 16 टक्के महिलांमध्ये सेक्स करण्याची इच्छा हा मोठा अडथळा आहे. शारिरीक संबंध आणि चिंतेचा परस्पर संबंध myUpchar शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या मते, तणाव आणि नैराश्याचा परिणाम दीर्घकालीन सेक्स आणि सेक्स स्टॅमिना वाढवण्यात अडथळा निर्माण करतात. त्याचप्रमाणे सेक्शुअल मेडिसिन रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, लैंगिक उत्तेजनादरम्यान जेव्हा चिंता किंवा तणाव असतो तेव्हा त्याचा परिणाम शरीराच्या मज्जासंस्थेवर होतो. याचा परिणाम लैंगिक संबंधांवर होतो. सेक्समध्ये अधिक चांगले करण्याची चिंता ही खरोखरच मोठी समस्या आहे. त्यावर नियंत्रण ठेवता आले तर लैंगिक जीवन निरोगी आणि आनंददायी होऊ शकते. या संदर्भात काही सूचनाही दिल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे आहेत. शारीरिक तपासणी करावी सहसा शारीरिक संबंधादरम्यान शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होते. अशा परिस्थितीत, जर कोणी मधुमेह, संधिवात किंवा एंडोमेट्रिओसिसचा रुग्ण असेल तर तो पटकन तणावाखाली येऊ शकतो. त्यामुळे तुमची शारीरिक तपासणी करून घ्यावी. जर योग्य कारणे माहित असतील तर सेक्स करताना देखील कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आपल्याला शरिराला अधिक चांगले समजून घ्या सहसा शारीरिक संबंधादरम्यान शरीराची कामगिरीमुळे देखील आपल्याला लाज वाटू शकते. शरीर लठ्ठ किंवा दुबळे असेल तर न्यूनगंड (inferiority complex) निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत नातेसंबंधादरम्यान आपले शरीर स्वीकारण्यास शिका. प्रायव्हेट पार्टच्या दुखण्याने हैराण? या घरगुती उपायांनी होईल सुटका सेक्सबद्दल शिक्षित व्हा लैंगिक शिक्षणाचा अभाव हे देखील यामागचे एक प्रमुख कारण असू शकते. याबाबत डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली पाहिजे. अनेकदा लैंगिक संबंध चांगले प्रस्थापित होत असतील, मात्र, तुमच्या अज्ञानामुळे तुम्हाला तसं वाटत नसेल. त्यामुळे लैंगिक शिक्षण असणे गरजेचे आहे. myUpchar शी संबंधित डॉ. मेधावी अग्रवाल यांच्या मते, लैंगिक संक्रमित आजारांबाबत म्हणजेच STD बाबत जागरुक असणे गरजेचे आहे. म्हणजेच असुरक्षित मार्गाने सेक्स केल्याने कोणते रोग होऊ शकतात हे जाणून घेतले पाहिजे. तुमच्या जोडीदाराशी उत्तम संवाद ठेवा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी जोडीदाराशी चांगल्या गप्पा मारा. लैंगिक संबंधांबाबत अजिबात संकोच करू नका. तुमच्या जोडीदाराशी तुम्ही सेक्सबद्दल जो काही विचार करता किंवा अपेक्षा करता त्याबद्दल बोला. याशिवाय पार्टनरसमोर लाज वाटू देऊ नका. त्याचवेळी, तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा लैंगिक संबंधांमधील कार्यक्षमतेबद्दल मन चिंतित असेल तर योग आणि ध्यानाची मदत देखील घेतली जाऊ शकते. आहाराचीही काळजी घेतली पाहिजे. जास्त तेलकट आणि चरबीयुक्त अन्न खाऊ नये, त्यामुळे शरीरातील चरबी वाढते आणि स्नायू लवचिक राहत नाही, ज्यामुळे लैंगिक संबंधादरम्यान शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. News18 वरील आरोग्यविषयक लेख myUpchar.com द्वारे लिहिलेले आहेत. myUpchar हे आरोग्य बातम्यांचे देशातील पहिले आणि प्रमुख माध्यम आहे. myUpchar मध्ये डॉक्टरांसह संशोधक आणि पत्रकार तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन येत असतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sex education, Stress

    पुढील बातम्या