JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / निवृत्त IAS आयएएस अधिकारी, जे बंगल्यात नाही तर गोशाळेत राहतात, काय आहे कारण?

निवृत्त IAS आयएएस अधिकारी, जे बंगल्यात नाही तर गोशाळेत राहतात, काय आहे कारण?

देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय सेवेतून एस गुप्ता हे निवृत्त झाले आहेत.

जाहिरात

सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एसपी गुप्ता

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धर्मबीर शर्मा, प्रतिनिधी गुरुग्राम, 28 जून : स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे जीवन सोपे व्हावे, आनंदमयी व्हावे, यासाठी एक सामान्य माणूस नोकरी करतो. त्यात नोकरी जर आयएएस अधिकाऱ्याची असेल तर ऐशोआरामात जीवन जगण्याचे साकार होऊन जाते. मात्र, असे काही लोक आहेत, जे असे ऐशोआरामचे जीवनाचा त्याग करतात आणि निराधार प्राण्यांची सेवेत आपलं आयुष्य घालवतात. आज अशाच एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊयात. गुरुग्रामचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एसपी गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय सेवेतून एस गुप्ता हे निवृत्त झाले आहेत. त्यांनी हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. मात्र, सेवानिवृत्तीनंतर एसपी गुप्ता यांनी गायमातेच्या सेवेला नवीन नोकरी म्हणून स्वीकारली. यामुळे त्यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेल्या पैशातून गुरुग्रामपासून दूर असलेल्या नूहमध्ये गोशाळा बांधला.

मागील 13 वर्षांपासून एसपी गुप्ता हे गोशाळा चालवत आहेत. त्यांनी मेवातची निवड खास यासाठी केली कारण, हरियाणात सर्वाधिक गायींची तस्करी याच भागात होते. एसपी गुप्ता म्हणाले की, निवृत्तीनंतर त्यांना अचानक वाटले की, आपण आपले उर्वरित आयुष्य गायीच्या सेवेत घालवावे, म्हणून एसपी गुप्ता यांनी आपले घर सोडले आणि मेवातमध्ये गोशाळा बांधला. त्यातच राहायला लागले. मात्र, त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही या गोशाळेत सेवेत त्यांना साथ देत आहेत. दोन्ही पती पत्नी मिळून दररोज येथे राहणाऱ्या सुमारे 300 गायींची काळजी घेतात.

याठिकाणी गायींची काळजी घेण्याबरोबरच बायोगॅसबरोबरच त्यांच्या शेण आणि गोमूत्रापासून दैनंदिन वापराच्या वस्तूही बनवल्या जातात. गाईच्या शेणापासून अगरबत्ती, फरशी क्लिनर, अगरबत्ती स्टँड, बायो गॅस, अगरबत्ती, तुळस, अगरबत्ती या वस्तू बनवल्या जातात. त्यातून येणारा पैसा या गायींच्या संगोपनावर खर्च केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या