क्रिस्पी चिकन
नवी दिल्ली, 24 मार्च : चिकन हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. चिकन म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण प्रत्येकालाच चिकन बनवता येतं, असं नाही. ज्यांना बनवता येतं, ते घरीच बनवतात. पण ज्यांना नाही येत ते बाहेरून मागवून खातात. असेच खवय्ये ज्यांना चिकन बनवता येत नाही त्यांच्यासाठी चिकनची ही खास रेसिपी आहे. चिकन प्रोटिनचा उत्तम सोर्स आहे. त्यामुळे ते खाणं आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अशातच 25 मिनिटांत तुम्ही अप्रतिम क्रिस्पी चिकन बनवू शकता. आपण त्याची रेसिपी जाणून घेऊयात. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय. हेही वाचा - शिळे नूडल्स खाल्ल्याने तरुणाची गंभीर अवस्था; कापावे लागले हातपाय, नेमकं प्रकरण काय? चिकनसाठी लागणारं साहित्य - 250 ग्रॅम चिकन, 1 कप पीठ, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, 2 कप तेल, दोन टीस्पून पॅपरिका, गरजेनुसार काळी मिरी, एक प्लेट पँको क्रंब्स, एक टीस्पून ओरिगानो आणि एक टीस्पून चिली फ्लेक्स, हे साहित्य लागेल. स्टेप 1 - चिकन कोमट पाण्याने धुवून घ्या आणि धुतल्यानंतर त्यात असलेले अतिरिक्त पाणी काढून टाका. स्टेप 2- चिकनच्या तुकड्यांतील पाणी टिपून घ्या आणि फोर्कचा वापर करून ते उचला स्टेप 3- मोठा बाऊल घ्या, त्यात ताक घुसळून घ्या. त्यात लसूण पावडर, पॅपरिका, मीठ व काळी मिरी टाका. स्टेप 4- बॅटर तयार झाल्यावर चिकनचे तुकडे टाका आणि ठेवून द्या. स्टेप 5 - दुसरा बाऊल घ्या. त्यात कॉर्न फ्लॉवर, पीठ, मीठ, काळी मिरी टाका आणि पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. चिकन आधीच्या मिश्रणात मिसळल्यानंतर आता त्याला या बाऊलमध्ये टाका. स्टेप 6- एका प्लेटमध्ये बारीक केलेले ब्रेड घ्या. मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरिगानो त्यात टाका. चिकनचे तुकडे त्यात टाका, जेणेकरून ब्रेड चिकनला चिकटेल. स्टेप 7 - पॅन घ्या, त्यात तेल ओता, चिकनचे पिसेस क्रिस्पी होईपर्यंत ते डीप फ्राय करा. चिकन जास्त हेल्थी बनवण्यासाठी तुम्ही 200 डिग्री सेल्सियसवर त्याला 25 मिनिटांसाठी एअर फ्राय करू शकता.
अशा रितीने तुमचे टेस्टी, क्रिस्पी चिकन बनून तयार होईल. घरीच तुम्ही हॉटेलसारखे क्रिस्पी चिकन बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला वर दिलेले साहित्य आणि दिलेल्या स्टेप्स नीट फॉलो कराव्या लागतील.