नवी दिल्ली, 21 मार्च : आजकाल धावपळीच्या जगात लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे. खाणं-पिणं, प्रवास, काम, या सर्वच गोष्टींचा परिणाम जीवनशैलीवर होतो. धावत्या शैलीमुळे सर्व कामच जलद गतीने करतात. त्यामुळे खाण्यापिण्यावर याचा गंभीर परिणाम होतो. अनेकजण शिळं राहिलेलं अन्नही मोठ्या प्रमाणात खातात. मात्र याचा आरोग्यावर वाईट परिणामही होतो. सध्या समोर आलेल्या घटनेत एका मुलाने शिळे नूडल्स खाल्ल्याने हात पाय कापावं लागल्याची घटना घडलीये. हे प्रकरण नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या अहवालाच्या आधारे जेसी नावाच्या मुलाची ही कहाणी आहे. जेसी नावाच्या विद्यार्थ्याच्या रूममेटने रेस्टॉरंटमधून चिकन नूडल्स मागवले होते. थोडं खाऊन झाल्यावर उरलेल्या नूडल्स फ्रीजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी जेसीने हे चिकन नूडल्स खाल्ले आणि त्याची तब्येत बिघडू लागली. जेसीला खूप ताप आला आणि त्याच्या हृदयाचे ठोके 166 बीट्स प्रति मिनिट झाले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना बेशुद्ध केले. 20 तासांपूर्वी जेसी तंदुरुस्त होता, परंतु नूडल्स खाल्ल्यानंतर त्याला वेदना आणि उलट्या झाल्या आणि संपूर्ण शरीर निळे झाले.
हेही वाचा - आईस्क्रीम डोसा नंतर... मटका डोसाने वेधलं लक्ष, Video पाहून तोंडाला सुटेल पाणी
शुद्धीवर आल्यावर जेसीला बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आहे आणि त्याला सेप्सिस आहे. त्यामुळे त्यांच्या किडनीनेही काम करणे बंद केलं होतं. सेप्सिसचा प्रसार झपाट्याने होत असल्याने डॉक्टरांना मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याची बोटे आणि गुडघ्याखालील पाय कापावे लागले. जेसीला अॅलर्जी नव्हती, पण तो गांजा-सिगारेट ओढायचा. तज्ज्ञांच्या मते, त्यांची ही अवस्था शिळ्या अन्नामुळे झाली होती. 26 दिवसांनंतर जेसी पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याचे आयुष्य बदलले होते. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
दरम्यान, तुम्ही काय खाताय याचा तुमच्या शरीरावर तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे काहीही खाताना किंवा घेताना ते योग्य आहे का चेक करा. शिळं किंवा एक्पायरी डेट संपलेलं तर नाही ना चेक करा. यापूर्वीही खाण्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Lifestyle, Top trending, Video viral, Viral