तुमच्या चपात्या फुलत नाहीत का? मग वापरा या सोप्या टिप्स
जेवणाच्या ताटात तुमच्यासाठी जर गरमागरम फुललेल्या चपात्या असल्या तर त्यांना खाण्याचा आनंद आणखीनच वाढतो. छान फुललेल्या लुसलुशीत चपात्या खायला सर्वांनाच आवडतात पण अनेक प्रयत्न करून देखील बऱ्याच जणांना अशा चपात्या करता येत नाहीत. तेव्हा आज तुम्हाला फुगणाऱ्या आणि मऊ लुसलुशीत चपात्या कशा बनवायच्या हे सांगणार आहोत. फुललेली चपाती बनवण्यासाठी सोपी पद्धत : मऊ आणि फुलणारी चपाती बनवण्यासाठी सर्वप्रथम पीठ व्यवस्थित मळून घ्या. यासाठी एका भांड्यात मैदा आणि चिमूटभर मीठ टाका. मग या पिठात एक चमचा तेल घालून चांगले मिक्स करून घ्या, यानंतर त्यात थोडे थोडे कोमट पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या. लक्षात घ्या की मऊ चपात्या बनवण्यासाठी बिजवण्यात आलेले पीठ तितकेच मऊ आणि आणि छान मळलेले असायला हवे. तसेच फुलणाऱ्या चपात्यांसाठी चांगल्या प्रतीचे गहू निवडणे देखील आवश्यक आहे. Health : एक महिना साखर खाण सोडलं तर काय होईल? शरीरात दिसतील 5 बदल, जाणून घ्या फायदे आणि तोटे
पीठ मळताना पिठाचा गोळा हा ४ ते ५ मिनिटे आलटून पालटून घ्या. त्यामुळे पीठ अतिशय मऊ आणि गुळगुळीत होते. मळलेले पीठ २० मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे पीठ फुगून चांगले सेट होईल. पीठ काहीसे सेट झाल्यावर हातावर थोडे तेल घेऊन पुन्हा एकदा पीठ मळा. यानंतर पिठाचा गोळा तयार करून त्याला कोरडे पीठ लावून लाटून घ्या. चपाती लाटताना ती काठावरून लाटून गोल करा. तवा गरम झाल्यावर त्यावर चपाती घाला आणि वरचा रंग काहीसा गडद होऊ लागला की तव्यावरची चपाती फिरवा. यानंतर दुसरी बाजू हलकी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर चपाती तव्यावरून कडून थेट गॅसच्या आचेवर फिरवून घ्या. असे केल्याने चपात्या फुलायला सुरुवात होते.