JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Solapur News : लॉकडाऊनमध्ये तयार केली नवी डिश, 'हे' चाट तुम्ही कधीच खाल्लं नसेल, Video

Solapur News : लॉकडाऊनमध्ये तयार केली नवी डिश, 'हे' चाट तुम्ही कधीच खाल्लं नसेल, Video

Famous Food : लॉकडाऊनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करताना तयार केलेली ही डिश सोलापूरमध्ये चांगलीच फेमस झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 20 फेब्रुवारी : फास्ट फुड हा अनेकांचा आवडता प्रकार आहे. झटपट तयार होणारा, वेगवेगळ्या भागात सहज उपलब्ध होणारा फास्ट फुडमधील चाटचे प्रकार महाराष्ट्रात चांगलेच लोकप्रिय आहेत. प्रत्येक शहरात या प्रकारचे स्टॉल प्रसिद्ध आहेत. या स्टॉलवर हमखास गर्दी असते. चाट खाण्याची दिवसातील अशी कोणती वेळ नाही. पण, वेळवेर खाण्यासाठी चाट नक्कीच लागतात. फास्ट फुड आणि होममेड यांचे अनोखे मिश्रण असलेला एक सोलापुरी चाट चांगलाच प्रसिद्ध आहे. तो चाट काय आहे? त्याची खासियत काय हे पाहूया सोलापुरी चाट कोन सोलापूरच्या पवन पालीलावल यांचे जेमतेम शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. एका स्थानिक केटरर्सकडं त्यांनी दोन वर्ष काम केलं. त्यानंतर स्वत: सोलापुरी चाट कोन ही डिश सुरू केली. लॉकडाऊनमध्ये स्वत:चा काही तरी व्यवसाय सुरू करावा या हेतूनं त्यांनी ओम स्नॅक्स सेंटर सुरू केलं. येथील चाट कोन संपूर्ण सोलापुरात प्रसिद्ध आहे. तुम्ही आईस्क्रिमचे कोन किंवा चॉकलेटचे वेफल खाल्ले असतील. त्याचपद्धतीनं दिसणारा हा सोलापुरी चाट आहे. हा पदार्थ कसा तयार करायाचा ते पाहूया Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, ‘नेप्ती’च्या भेळचा आहे भारीच थाट! - प्रथम बेसनच्या पापडीप्रमाणे कोनच्या आकारात पापड करून घ्यायची. - पॅनमध्ये स्पेशल बटाटा भाजी, चाट मसाला, काळे तिखट ,पिवळे तिखट ,मीठ, हळद लसूण पेस्ट ,भाजलेल्या तिखट शेंगा आणि अमोल बटर टाकून व्यवस्थित परतून घ्यावे. - त्यानंतर तयार केलेल्या कोनमध्ये ही रेडी झालेली भाजी टाकून सर्व्ह करावं. मी गेल्या अनेक दिवसांपासून ओम स्नॅक्स सेंटर येथे चाट कोण हा प्रकार खात आलो आहे एक वेगळी आणि ऑथेंटिक अशा पद्धतीची चव असणारी ही डिश आहे. सोलापुरात ही डिश एकाच ठिकाणी मिळते. त्यामुळे प्रत्येकानं ही डिश ट्राय केली पाहिजे अशी प्रतिक्रिया येथील नियमित ग्राहक राजू गोडगे यांनी दिली.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

कुठे खाणार? ओम स्नॅक्स सेंटर, कस्तुरबा मार्केटच्या समोर, बाळवेस, सोलापूर. अधिक माहितीसाठी संपर्क : पवन पालिवाल - +91 86007 96692

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या