मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, 'नेप्ती'च्या भेळचा आहे भारीच थाट!

Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, 'नेप्ती'च्या भेळचा आहे भारीच थाट!

X
नगर-कल्याण

नगर-कल्याण रोडवरील नेप्तीची सागर भेळ फेमस आहे. या चटपटीत भेळचा नगरकर आवडीने आस्वाद घेतात.

नगर-कल्याण रोडवरील नेप्तीची सागर भेळ फेमस आहे. या चटपटीत भेळचा नगरकर आवडीने आस्वाद घेतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar (Ahmednagar), India

    अहमदनगर, 26 ऑक्टोबर : थंड वातावरणात आपल्याला वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. लहान असो की मोठे सर्वांना भेळ, पाणीपुरी खायला आवडते. त्यात टेस्टी आणि यम्मी, चटपटीत भेळ कुठे मिळत असेल तर आपण आवर्जून तिथे जातो. नगर-कल्याण रोडवरील नेप्तीची सागर भेळ फेमस आहे. या चटपटीत भेळचा नगरकर आवडीने आस्वाद घेतात.

    भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. ओली आणि सुखी असे भेळचे दोन प्रकार असतात. चटकदार, चमचमीत साधी आणि सोपी भेळची रेसिपी असते. नगरकरांच भेळ खाण्याचं एकच ठिकाण ठरलेलं आहे. ते म्हणजे नगर-कल्याण रोडवरील नेप्तीची सागर भेळ. कुरकुरीत, खमंग भेळ इथे मिळते. नेप्ती गावचे रहिवासी असणारे सागर शिवाजी गाडेकर याचे हे भेळ सेंटर असून मागील 13 वर्षापासून भेळची विक्री होत आहे. नेप्ती गावच्या नवावरूनच भेळचे  देखील नाव पडले आहे.

    सुरुवातीचे 4 वर्षे ना नफा ना तोटा

    सागर गाडेकर यांनी सुरुवातीच्या काळात जवळपास 4 वर्षे ना नफा ना तोटा या पद्धतीने व्यवसाय चालवला. भेळ सेंटरची सुरुवात आधी एका छोट्या छपरात होती. कालांतराने हा व्यवसाय वाढत गेला. आता भेळ सेंटरला 13 वर्ष पूर्ण झाले असून सेंटर देखील प्रशस्त बनले आहे.

    निसर्गरम्य वातावरण

    नगर-कल्याण रोड नजीक रस्त्यालगत नैसर्गिक अधिवासात नेप्तीची सागर भेळ सेंटर असून याठिकाणी बसण्यासाठी खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरापासून काही अंतरावर निवांत, निसर्गरम्य वातावरण, मोकळी हवा, बसण्यासाठी खाट सोबत खमंग भेळ. यामुळे चिवडा खाण्याची मजा काही औरच येते. येथे  50 खाटांची व्यवस्था आहे. दररोज जवळपास 2 ते 3 हजार ग्राहक भेळचा आस्वाद घेत असल्याचे सागर गाडेकर सांगतात. 

    Video : आई की बायको कोणाच्या हातचा आवडतो फराळ?, अभिनेता संदीप पाठक म्हणतो…

     क्वालिटी आणि क्वांटेटी

    घरी बनवलेले फरसाण, शेव, कुरकुरीत मुरमुरे, चिरलेला कांदा, काकडी, कोथिंबीर,  तळलेली हिरवी मिरची. लाल मिरचीचा भुरका, चिंच गूळ चटणी, या सर्वांच्या मिश्रणातून ही चटकदार, चमचमीत, स्वादिष्ट भेळ बनते. ग्राहकवर्ग वाढला असला तरी नेप्तीच्या भेळची चव मात्र अगदी पूर्वीसारखीच टिकून आहे. 30 व 50 रुपये भेळची किंमत आहे. एका भेळ मध्ये दोन जण आरामशीर खाऊ शकतात, असे सागर यांनी सांगितले.

    First published:
    top videos

      Tags: Ahmednagar, Food, Tasty food