उन्हाळ्यात घामोळ्यांनी त्रस्त आहात? मग हे 5 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
सध्या कडक उन्हाळ्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. बाहेरील कडक उन अंगाची लाही लाही करत असून या उन्हाळ्यात अनेकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्या जाणवतात. उन्हाळ्या अधिकतर लोकांना घामोळे येतात. मान, पाठ, कंबर, छाती, कधीकधी चेहऱ्यावर देखील घामोळ्याचे पुरळ उठतात त्यामुळे त्वचेला खाज सुटते आणि जळजळ होते. जास्त घाम येणे, त्वचा स्वच्छ न ठेवणे, इत्यादींमुळे उन्हाळ्यात घामोळ्यांच्या समस्या जाणतात. ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त असते त्या ठिकाणी जास्त घाम आल्याने घामोळे येतात. तेव्हा उन्हाळ्यात तुम्हाला घामोळ्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. घामोळ्यांवर घरगुती उपाय : मुलतानी माती : जर तुम्हाला घामोळ्याची समस्या होईन तेथे सतत जळजळ आणि खाज येत असेल तर तुम्ही त्याजागेत मुलतानी माती लावू शकता. गामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. यासाठी 1 चमचा मुलतानी मातीत 1 चमचा गुलाबजल मिसळा आणि घामोळे आलेल्या भागावर लावा. मुलतानी मातीचा प्रभाव हा थंड असतो, ज्यामुळे जळजळ आणि खाज कमी होते. यासोबतच मुलतानी मातीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात, जे फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरिया इत्यादींमुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात.
एलोवेरा जेल : तुमच्या घरात कोरफड म्हणजेच एलोवेराच रोप असेल तर त्याचे जेल एका भांड्यात काढा. तसेच ज्याठिकाणी घामोळे आले असतील त्याठिकाणी लावून अर्धातास तसेच राहू द्या. एलोवेरा जेल त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्वचा मुलायम होते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल लावून झोपू शकता आणि सकाळी उठून थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हे जेल एक ते दोन दिवस लावल्यास घामोळे नाहीसे होती. बर्फ : घामोळे घालवण्यासाठी बर्फ देखील उपयोगी ठरू शकतो. यासाठी तुम्ही एका सुती कपड्यात 5 ते 6 बर्फाचे तुकडे टाका आणि कापडात घट्ट बांधून ते घामोळे आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे हळूहळू घामोळ्यांमुळे होणारी जळजळ, खाज कमी होईल. How to Clean Pigeon Poop : कबुतरांच्या विष्टेमुळे बाल्कनीत झालीये घाण? या सोप्या टिप्स वापरून काही मिनिटात बाल्कनी करा स्वच्छ कडुलिंब : कडुलिंबाच्या पानांनी घामोळ्यांवर उपचार करणे शक्य असते. कडुलिंबाची 15-20 पाने आणून ती स्वच्छ धुवा आणि एका भांड्यात अर्धा लिटर पाणीघेऊन त्यात ती पाने टाका. मग हे पाणी गॅसवर उकळायला ठेवा. कडुलिंबाचे पाणी थंड झाल्यावर त्याने घामोळे आलेली त्वचा स्वच्छ करा. यामुळे खाज आणि जळजळ कमी होतील. दही : दही हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तेव्हा दही घामोळे आलेल्या जागेवर लावा आणि थोडा वेळ असेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. दह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे बॅक्टेरिया नष्ट करतात.