जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / How to Clean Pigeon Poop : कबुतरांच्या विष्टेमुळे बाल्कनीत झालीये घाण? या सोप्या टिप्स वापरून काही मिनिटात बाल्कनी करा स्वच्छ

How to Clean Pigeon Poop : कबुतरांच्या विष्टेमुळे बाल्कनीत झालीये घाण? या सोप्या टिप्स वापरून काही मिनिटात बाल्कनी करा स्वच्छ

कबुतरांच्या विष्टेमुळे बाल्कनीत झालीये घाण? या सोप्या टिप्स वापरून काही मिनिटात बाल्कनी करा स्वच्छ

कबुतरांच्या विष्टेमुळे बाल्कनीत झालीये घाण? या सोप्या टिप्स वापरून काही मिनिटात बाल्कनी करा स्वच्छ

कबुतर घराच्या बाल्कनीत टेरेसवर येऊन विष्ठा करून जातात. त्यांच्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होतो. तेव्हा तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांनी तुम्ही बाल्कनीत कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेली घाण सहज साफ करू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये कबुतरांची संख्या मोठी आहे. अनेकदा ही कबुतर घराच्या छतावर, बाल्कनीत त्यांचे घरटे बनवतात तसेच त्याठिकाणी करत असलेल्या विष्टेमुळे घाण वास येतो आणि त्यामुळे नागरिक हैराण होऊन जातात. कबुतर घराच्या बाल्कनीत टेरेसवर येऊन विष्ठा करून जातात. त्यांच्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होतो. तेव्हा  तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांनी तुम्ही बाल्कनीत कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेली घाण सहज साफ करू शकता. सर्वप्रथम खबरदारी घ्या: कबुतराची विष्ठा साफ करण्यापूर्वी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण अनेकांना कबुतराच्या विष्ठेमुळे अॅलर्जी होण्याचा धोका असतो. म्हणूनच कबुतराची विष्ठा साफ करण्यापूर्वी हातमोजे आणि फेस मास्क नक्कीच वापरावा. तसेच स्वच्छता करताना पायात शूज किंवा स्लीपर घालून पायांचे चांगले संरक्षण करा. साफ करणारे द्रव तयार करा: कबुतराची विष्ठा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्सिंग लिक्विड तयार करा. यासाठी दोन चमचे डिशवॉशिंग लिक्विड घ्या आणि त्यात एक कप व्हिनेगर आणि एक कप पाणी मिसळून मिश्रण तयार करा. नंतर हे साफ करणारे द्रव विष्ठा असणाऱ्या भागांवर स्प्रे करा आणि सुमारे पंधरा मिनिटे असेच राहू द्या. यानंतर बाल्कनीची फरशी स्क्रबरने घासून स्वच्छ करा.

News18लोकमत
News18लोकमत

फ्लोअर क्लिनरने साफ करा: आता साफसफाईच्या पुढील टप्प्यात तुम्ही फ्लोअर क्लिनरच्या मदतीने बाल्कनी किंवा टेरेस स्वच्छ करा. यासाठी प्रथम बाल्कनी किंवा गच्चीवर फ्लोअर क्लीनर लावा आणि पंधरा मिनिटे तसंच राहू द्या. नंतर काड्यांच्या झाडूच्या मदतीने फरशी घासून स्वच्छ करा. फरशी स्वच्छ करण्याबरोबरच, फ्लोअर क्लिनरमध्ये असलेले सोडियम हायपोक्लोराईट विष्ठेत असलेले बॅक्टेरिया सहज साफ होतात. मायक्रोफायबर कापडाने साफ करा: फ्लोअर क्लिनरने फरशी साफ केल्यानंतर, फरशी व्यवस्थित पुसणे आवश्यक आहे. यासाठी डिस्पोजेबल मायक्रोफायबर कापडाचा वापर करा आणि बाल्कनी तसेच टेरेसचा मजला पुसून घ्या. यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने फरशी धुवा. यामुळे फरशी पूर्णपणे स्वच्छ होईल आणि दुर्गंधी देखील दूर होईल. Morning Routine : सकाळी पोट साफ होण्यात अडचण येते? मग हे 6 उपाय नक्की ट्राय करा काही गोष्टी लक्षात ठेवा: कबुतराची विष्ठा साफ करताना शूज किंवा चप्पल वापरा. तसेच, साफसफाई करताना बाल्कनी आणि टेरेसची रेलिंग चांगली धरून ठेवा. कारण कबुतराची विष्ठा खूप गुळगुळीत असते, ज्यामध्ये तुम्ही पाऊल टाकल्यास घसरून पडू शकता. तसेच, जर तुमची रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्ही कबुतराची विष्ठा साफ करणे टाळावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lifestyle
  • First Published :
जाहिरात
जाहिरात