मुंबई, 15 फेब्रुवारी : जीवनशैलीतल्या बदलांमुळे अनेक नवे आजार डोकं वर काढू लागलेत. शरीरात विविध जीवनसत्त्वांची कमतरता किंवा इतर समस्या निर्माण होत असल्यानं त्यांचं पर्यवसान दीर्घकालीन आजारांमध्ये होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केस अकाली पांढरे होण्याची समस्या प्रामुख्यानं जाणवू लागली आहे. वयाच्या विशीमध्येच तरूणांचे केस पांढरे होत आहेत. वरवर पाहता केस पांढरे होण्यामुळे कोणताही आजार होत नाही असं वाटत असलं, तरी डॉक्टरांच्या मते हे हृदय आणि मेंदूसाठी घातक असतं. ‘टीव्ही 9 हिंदी’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. केस लवकर पांढरे होणं, केस गळणं, कोंडा होणं किंवा केसांच्या आणखी काही समस्या होणं याचं प्रमाण सध्या खूप वाढलंय. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेळा, किटकनाशकांचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव तसंच पोषणमूल्यांची कमतरता यांच्यामुळे अशा समस्या निर्माण होतात. काही वेळेला परिस्थितीजन्य कारणंही असतात. मात्र अवघ्या विसाव्या वर्षी केस पांढरे होणं याकडे जीवनशैलीशी निगडीत समस्या इतकंच पाहणं उपयोगी नाही. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.
या उपायांनी रोज सकाळी पोट सहज होईल साफ, दिवसभर राहाल Fresh आणि Energeticकमी वयात केस पांढरे होण्यामुळे काही गंभीर समस्याही उद्भवू शकतात. काही वेळा हे आजार हृदय किंवा मेंदूशी निगडीतही असू शकतात. केसांशी निगडीत बहुतेक तक्रारी ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. परदेशात अनेक स्त्री-पुरूष सन बाथ घेतात असं आपण पाहिलं असेल. हा सन बाथ म्हणजेच उन्हात काही काळ थांबून ड जीवनसत्वाचा अभाव दूर करणं. ड जीवनसत्वामुळे केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचा आणि केसांचं पोषण होतं.
केस अकाली पांढरे होण्यामागे पोषणमूल्यांचा अभाव किंवा अनुवंशिकता हीच कारणं प्रामुख्यानं असल्याचा समज लोकांमध्ये असतो. मात्र याकडे इतकं वरवर पाहणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, असं डॉक्टरांना वाटतं. कमी वयात जर केस पांढरे होत असतील, तर त्यामुळं हृदय रोग किंवा ब्रेन ट्युमरचा धोका निर्माण होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. किशोरवयीन मुलांमध्ये ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होतात, असा निष्कर्ष 2013 मध्ये भारतातल्या काही संशोधकांनी काढला होता. मात्र अमेरिकन संशोधकांनी एक वेगळं संशोधन यासंदर्भात केलंय. त्यांच्या मते ट्युबर स्केलेरोसिस कॉम्प्लेक्स या आजारामुळे मेंदू, मणका, डोळे, फुप्फुस, हृदय तसंच किडनीमध्ये ट्युमर निर्माण होऊ शकतो. ट्युबर स्केलेरोसिस चारही दिशांना पसरतो आणि त्यामुळे शरीराची वाढ खुंटते. मेंदूमध्ये पसरल्यानं अपस्माराचे झटके येऊ शकतात. डोळ्यांमध्ये ट्युमर असेल, तर दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. हृदय आणि फुप्फुसांमधील ट्युमरमुळे श्वासोच्छवासात समस्या येऊ शकतात. त्यामुळेच तरूण वयात केस पांढरे होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय योग्य ठरतं.
धूम्रपान करता? तरीही Lungs ठेऊ शकता Healthy! आहारात घ्या हे पदार्थ(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)