जेवल्यानंतर बसणे आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे यामुळे बद्धकोष्ठता वाढते. यासाठी जेवणानंतर चालणे खूप गरजेचे आहे. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर अनेकजण औषधे घेतात.
या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास या समस्येपासून आराम मिळतो आणि आरोग्यही चांगले राहते. या घरगुती उपायांसोबत टिप्सदेखील आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
बद्धकोष्ठतेचा अनेक कारण असतात. जसे की, लक्ष देऊन न जेवणे, कोरडं, थंड, तिखट किंवा तळलेले पदार्थ जास्त खाणे. पुरेसं पाणी न पिणे. झोप व्यवस्थित न होणे किंवा रात्री उशिरा जेवण करणे. त्यासोबत अजिबात व्यायाम न करणे.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळून प्या. सकाळी उठल्याबरोबर हे प्या. या पाण्यामुळे पोट साफ होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळा. हे पाणी रोज प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. हे पाणी तुम्ही मुलांनाही देऊ शकता.
रोज सकाळी एक चमचा गाईचं तूप कोमट पाण्यासोबत किंवा रोज रात्री झोपताना 1 चमचा गाईचं तूप कोमट दुधासोबत घेतल्यास बद्धकोष्टतता होत नाही. या उपायामुळे आतडे स्वच्छ होण्यास मदत होते.
रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. रोज सकाळी उठल्यावर सरावात आधी हे पाणी प्यायल्याने पोट व्यवस्थित साफ होते.
टाॅयलेटमध्ये घाई करणे, पुस्तक वाचणे, मोबाइल पाहाणे ही कामं करु नये. पोट साफ होण्यासाठी पुरेसा वेळ देणंही आवश्यक आहे. त्याचबरोबर पोट साफ होण्यासाठी टाॅयलेटला जाण्याची एक वेळ ठरवणं आवश्यक आहे.
दिवसातून एकदातरी जेवणात कच्च्या सॅलेडचा अवश्य समावेश करावा. त्याचसोबत रोज न चुकता व्यायाम करावा. शारीरिक हालचाल पुरेशी असल्यास पोट साफ होण्यास मदत होते.