चहा
ऋषभ चौरसिया, प्रतिनिधी लखनऊ, 11 जुलै : भारतीय लोकांसाठी चहा हे एक महत्त्वाचे पेय आहे कारण ते त्यांची पहिली पसंती आहे. चहा हा भारतीय सभ्यतेचा आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. सकाळची सुरुवात करताना चहा पितात. तसेच थकवा दूर करण्यासाठी चहा अत्यंत आवर्जून घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील लोकांना इराणी चहाची चव खूप पसंत पडत आहेत. हा चहा तर चविष्ट तर आहेच पण तो बनवण्याची प्रक्रियाही खूप मनोरंजक आहे. इराणी चहाच्या दुकानाच्या मालकाने सांगितले की, चहा विकण्याची कल्पना त्यांना मुंबईच्या प्रवासादरम्यान आली. स्वत:च्या पायावर उभं राहण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात होती आणि लखनौच्या लोकांना चवीची खूप आवड आहे हे त्यांना माहीत होतं. त्यामुळेच त्यांनी येथे इराणी चहाचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यांची इराणी चहा बनवण्याची पद्धत अतिशय खास आहे. याठिकाणी आधी 4 ते 5 तास मंद आचेवर दूध उकळले जाते. यानंतर चहापत्ती वेगळी उकळली जातात आणि शेवटी, दूध आणि चहापत्ती यांना एकत्र केले जाते. इराणी चहा चाखल्यानंतर त्यांचे मन ताजेतवाने होते, असे दुकानात भेट देणारे ग्राहक सांगतात. येथील चहाची चव अनोखी असून तो इतरत्र कुठेही मिळत नसल्याचे ते सांगतात. हा चहा त्यांना ताजेतवाने तर करतोच, शिवाय नवीन चवही देतो. तुम्हालाही हा चहा चाखायचा असेल, तर तुम्हाला न्यू इराणी चहा, हुसेनाबाद रोड येथे यावे लागेल. चारबाग रेल्वे स्थानकावरून तुम्ही ऑटो कॅबने सहज पोहोचू शकता.