optical illusion
मुंबई, 18 फेब्रुवारी : दृष्टिभ्रमाची छायाचित्रं आणि चित्रं बुद्धीचा कस पाहणारी असतात. यात डोळ्यांना दिसतं तेवढंच सत्य नसून बुद्धीनुसार तर्क लावायचा असत. अनेकांना ही कोडी उलगडत नाहीत. जे खरोखर बुद्धिमान असतात, त्यांनाच ते शक्य होतं. ऑप्टिकल इल्युजन्स म्हणजे दृष्टिभ्रमाचे खेळ व्यक्तिमत्त्व विकासासाठी, तसंच बुद्धिमत्ता तल्लख करण्यासाठी खेळले जातात. सोशल मीडियावर अशी चित्रं व छायाचित्रं भरपूर लोकप्रिय होतात. असंच एक दृष्टिभ्रमाचं छायाचित्र सध्या मीडियावर व्हायरल होतंय. प्राण्यांच्या एका कळपात लपलेलं अस्वल शोधण्यासाठी वाचकांना त्यांचं कौशल्य पणाला लावावं लागेल. फोटोमध्ये एका मैदानी भागात अनेक तपकिरी-करड्या रंगाचे प्राणी एकत्र दिसत आहेत. एका दिशेनं ते चालत आहेत. त्यांच्यातच एक अस्वल लपलं आहे. त्या अस्वलाचा रंगही त्या प्राण्यांसारखाच तपकिरी आहे. त्यामुळे ते शोधणं खूपच अवघड आहे. हे प्राणी खूप जवळजवळ असल्यानं त्यांच्यातून अस्वलाला शोधणं कठीण होऊ शकतं; मात्र बारकाईने निरीक्षण केलं तर नक्कीच ते सापडू शकेल. हेही वाचा - नजर तीक्ष्ण असेल तर ‘या’ पेंटिंगमध्ये लपलेला कुत्रा शोधून दाखवाच; तुमच्याकडे आहेत फक्त 10 सेकंद तीक्ष्ण नजर आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या जोरावरच अशी कोडी सोडवता येतात. अनेकदा निरीक्षणकौशल्य कमी पडतं. त्यामुळे कोडी लवकर सुटत नाहीत. ज्यांना ही कोडी सोडवायची सवय असते, त्यांना त्यामागची ट्रिक लगेच कळू शकते. अनेकांना हे कोडं अजून सुटलेलं नाही. खूप डोकं चालवूनही हे कोडं सुटणं अवघड जातंय. एक एक प्राणी नीट पाहिला, तर कदाचित अस्वल सापडू शकेल; पण तुम्हाला हे कोडं सोडवणं अवघड वाटत असेल, तर फोटोच्या उजव्या भागात पाहा. तिथे अस्वलाचं तोंड दिसत आहे. सोबत दिलेल्या फोटोत अस्वल पाहता येऊ शकेल. ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाचा उपयोग मानसशास्त्रामध्ये केला जातो. दृष्टिभ्रम म्हणजे एखाच्या वस्तूची, गोष्टीची डोळ्यांना फसवणारी प्रतिमा. दृष्टिभ्रम भौतिक, शारीरिक आणि आकलनात्मक असे तीन प्रकारचे असतात. माणसाचा मेंदू गोष्टींचं आकलन कसं करतो, हे जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रातही दृष्टिभ्रमाचा वापर केला जातो. एखाद्या चित्राकडे किंवा परिस्थितीकडे सामान्य माणूस खूप वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांमधून पाहू शकतो. मेंदूला अधिक तल्लख करण्याच्या दृष्टीनं दृष्टिभ्रम खूप फायदेशीर ठरतात. विशिष्ट प्रकारची रंगसंगती, प्रकाशयोजना, आकार यांच्यामुळे आपला मेंदू नसलेल्या गोष्टीची प्रतिमा तयार करतो. मेंदूची समजून घेण्याची क्षमता ओळखण्यात याचा फायदा होतो. बुद्धिमत्ता चाचणीव्यतिरिक्त अशी कोडी खूप मनोरंजकही असतात. त्यामुळे त्यांना भरपूर पसंती मिळते.