जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नजर तीक्ष्ण असेल तर 'या' पेंटिंगमध्ये लपलेला कुत्रा शोधून दाखवाच; तुमच्याकडे आहेत फक्त 10 सेकंद

नजर तीक्ष्ण असेल तर 'या' पेंटिंगमध्ये लपलेला कुत्रा शोधून दाखवाच; तुमच्याकडे आहेत फक्त 10 सेकंद

optical illusion

optical illusion

पेटिंगमधील या उद्यानातील बेंचवर काही लोक गप्पा मारत बसल्याचे दिसते. काही लोक रनिंग करत आहेत

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 18 फेब्रुवारी:    सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटोज किंवा पेंटिंग्ज व्हायरल होत असतात. अशा फोटो किंवा पेंटिंगमध्ये लपलेली एखादी वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती कमी वेळात शोधून दाखवण्याचं आव्हान नेटकऱ्यांना दिलं जातं. अलीकडच्या काळात असे अनेक फोटो, पेंटिंग्ज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या ऑप्टिकल इल्युजन असलेलं असंच एक पेंटिंग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे पेंटिंग एका बागेतलं आहे. या बागेत एक कुत्रा लपून बसला आहे. हा कुत्रा शोधून दाखवण्याचं आव्हान नेटकऱ्यांना देण्यात आलं आहे. यासाठी नेटकऱ्यांना 10 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल आणि तुम्ही बुद्धिमान असाल तर तुम्ही नक्कीच लपलेला कुत्रा वेळेत शोधून काढू शकाल. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो किंवा पेंटिंग व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. असे फोटो, पेंटिंग पाहून युजर्स क्षणभर संभ्रमात पडताना दिसतात. हे फोटो, पेंटिंग दृष्टी आणि मेंदूची परीक्षा घेण्यासाठी डिझाईन केलेले असतात. सध्या असंच एक पेटिंग जोरदार व्हायरल होत आहे. हे पेंटिंग पाहिल्यावर नेटकरी संभ्रमात पडताना दिसत आहेत. हेही वाचा -  Optical Illusion : केवळ बुद्धिमान व्यक्तीच देऊ शकतात या कोड्याचं उत्तर; 9 सेकंदांमध्ये ओळखा चूक या खास पेंटिंगमध्ये एक कुत्रा लपलेला आहे. नेटकऱ्यांना हा कुत्रा केवळ दहा सेकंदात शोधून दाखवायचा आहे. हे पेंटिंग एका उद्यानातील आहे. या उद्यानातील बेंचवर काही लोक गप्पा मारत बसल्याचे दिसते. काही लोक रनिंग करत आहेत तर लहान मुलं खेळताना दिसत आहेत. यात एक कुत्रा लपून बसला आहे. तुम्हाला हा कुत्रा दहा सेकंदात शोधून काढायचा आहे. खरं तर लपलेला कुत्रा शोधून काढणं सोपं नाही. त्यामुळे हे पेंटिंग ऑप्टिकल इल्युजनचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या पेंटिंगचे खास वैशिष्ट म्हणजे पेटिंग रेखाटणाऱ्या आर्टिस्टने अशा प्रकारे रेखाटले आहे की अनेक नेटकऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना लपलेला कुत्रा सापडू शकलेला नाही. जर तुम्ही बुद्धिमान असाल आणि तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही दिलेल्या वेळेत कुत्रा शोधून दाखवायला हवा. प्रयत्न करूनही तुम्हाला कुत्रा सापडत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. पुन्हा एकदा पेंटिंगकडे नीट निरखून पहा. त्यात एक छोटासा पूल दिसत असेल. त्या पुलाखाली एक कुत्रा बसलेला आहे. पुलाच्या बांधकामाचा आणि कुत्र्याचा रंग सारखाच असल्याने कुत्रा सहजासहजी दृष्टीस पडत नाही. त्यामुळे अनेक युजर्स कुत्र्याला शोधण्यात अपयशी ठरत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात